चांदणी चौकातील टेकडीवर होतात या गोष्टी

सकाळ संवाद
Friday, 6 March 2020

Image may contain: tree, sky, plant, cloud, grass, outdoor and nature

Image may contain: tree, sky, plant, cloud, grass, outdoor and nature

चांदणी चौक परिसरात कचऱ्याची समस्या 
गार्डन कोर्ट रेस्टॉरंट जवळील चांदणी चौकात दररोज टेकडीवर कचरा टाकण्याचे प्रकार घडतात. येथील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर महापालिका प्रसासनाने कारवाई करावी. 
- अनघा नारकर 

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना 
पायी चालणे होतेय अवघड 

शैलजा हॉटेल व ममता स्वीट येथील समान रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, सायंकाळी 7 ते 9 या वेळेत नागरिकांना पायी चालणेही अवघड झाले आहे. 50 फुटांवर पोलिस कार्यालय व 100 फुटांवर महापालिकेचे मुख्य कार्यालय आहे. येथे अशी अवस्था असेल; तर संपूर्ण पुण्याचे काय.. कसा होणार पुण्याचा विकास.. 
- हरिश्‍चंद्र जाधव 

 

Image may contain: car and outdoor

 

सरकारने टोलवसुलीचे दर वाढवू नयेत 

पुणे : सर्वच राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुलीचे दर दरवर्षी वाढत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती व मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुलीचे दर एप्रिलपासून वाढविले आहेत. निविदेतील ठरलेल्या करारानुसार ही दरवाढ असली, तरी दीडपट जास्त टोलवसुली व दरवर्षी पाच टक्‍क्‍यांनी वाढणारी वाहनांची संख्या हे गृहीतकच मुळात चुकीचे आहे. यापेक्षा कित्येक पटीने वाढणारी वाहनसंख्या व जादा होणारी टोलवसुली याचा विचार करून टोलवाढ थांबवावी. पायाभूत सुविधा निर्माण न करता "फास्टॅग'ची सक्ती, मुदतीपेक्षा दुप्पट काळ लोटूनही महामार्गाचे काम पूर्ण न करणे, रस्त्यावर असणारे असंख्य खड्डे व त्यामुळे होणारे अपघात, कोंडीमुळे होणारी लाखो लिटर इंधनाची नासाडी याची जबाबदारी करारानुसार संबंधित ठेकेदाराची नाही का? याठिकाणी केवळ नागरिकांनाच वेठीस धरले जाते. ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नाही. हे न उलगडलेले कोडे आहे. सरकारने याचा आढावा घेऊन टोलवाढ व अपूर्ण कामाच्या ठिकाणी टोलवसुलीवर बंदी आणावी. 
- शिवाजी पठारे 

Image may contain: sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These things happen on the hill in the moonlight