पोलिसांनी झाडावर केल्या या गोष्टी

सकाळ संवाद
Friday, 6 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

"क्‍यूआर कोड'चे तक्ते लावण्यासाठी 
झाडावरच खिळे ठोकणे चुकीचे 

वाकडेवाडी : "क्‍यूआर कोड'चे तक्ते लावण्यासाठी पोलिसांनी झाडावरच खिळे ठोकले आहेत. वाकडेवाडी येथील अश्विनी सोसाईटीच्या गेटच्या बाहेरचे हे दृष्य आहे. कायद्याने याला बंदी आहे, याची नोंद घ्यावी. 
- सचिन जाधव 

उघड्या "डी. पी. बॉक्‍स'मुळे धोका 
घोले रोडवरील मॉडर्न स्कूलजवळच्या पथ दिव्याचा हा "डी. पी. बॉक्‍स' मोडला असून, त्यामुळे येथे धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी शालेय मुलांची सतत वर्दळ असते. या "डी. पी.बॉक्‍स'ला कोणाचा चुकून हात जरी लागला तरी, शॉक बसून गंभीर अपघात होऊ शकतो. महापालिकेने याची त्वरित दखल घेऊन डी. पी. बॉक्‍सची दुरुस्ती करावी. 
- सचिन 

बसथांब्यांवर शेडची मागणी 
औंध : सूस रस्त्यावरील बसथांब्यांवरील शेड अचानक एका रात्रीत काढून टाकले. सध्या ऊन वाढले आहे. तसेच बसथांब्यांजवळच काही गाड्या उभ्या असतात. त्यामुळे येथे बसला थांबताच येत नाही. बस तशीच पुढे जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एकाच ठिकाणी दोन शेड आहेत. आम्हीही एकाच शेडची मागणी करीत आहोत. याबाबत प्रशासनाने विचार करावा. 
- कुप्पुस्वामी कृष्ण 

शिवशंकर सेवा मंदिर चौकातील 
धोकादायक चेंबर दुरुस्त करावा 

टिंबर मार्केट : शिवशंकर सेवा मंदिर चौकातील चेंबर खचले आहे. येथे लाकुड बाजरात ग्राहकांची हमाल, मजुर, कामगार, टेम्पोवाले व शिवशंकर सेवा मंदिरांत येणाऱ्या भाविकांची वर्दळ सारखी असते. रात्रीच्या अंधारात हे खचलेले चेंबर दिसले नाही तर वाहनचालक किंवा पादचाऱ्यांचा अपघात घडु शकतो. त्यामुळे महापालिकेच्या संबंधीत विभागाने हे धोकादायक अवस्थेत असलेले चेंबर लवकरात लवकर दुरुस्त करावे. 
-विजय जगताप 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These things the police did on the tree