अंधार असताना मुले बागेत करतात या गोष्टी

सकाळ संवाद
Thursday, 27 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सगळ्या बागा व्यापल्या विद्यार्थ्यांनीच; 
जेष्ठ नागरिकांची होतेय गैरसोय 

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये असलेल्या बागांमधील दृश्‍य पाहता सगळीकडे कॉलेजची मुले अभ्यास करताना दिसतात. त्यांनीच सगळ्या बागा व्यापलेल्या दिसतात. अंधार असेल तर मोबाईलच्या प्रकाशात ते अभ्यासही करतात. मोबाईलच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना काय दिसते देव जाणे. मोकळी जागा म्हणून दिसत नाही. त्यामुळे असा प्रश्न पडतो, की बागा या जेष्ठ नागरिकांना फिरायला आहेत, मुलांना खेळायला आहेत, व्यायाम करायला आहेत, की कॉलेजच्या मुलांसाठी अभ्यासिकेला पर्याय म्हणून आहेत? 
- स्नेहा गोरे 

Image may contain: one or more people, tree, sky, grass, outdoor and nature

बस थांब्यासह आसन व्यवस्था 
आणि निवारा शेड उभारावे 

औंध : बालकल्याण संस्था, औंध रोड याठिकाणी दिव्यांग बांधवांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात देशभरातून आलेले दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. याठिकाणी "पीएमपी' बस थांबा नसल्याने संमेलनासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना खूप त्रास झाला. त्यांना उन्हात उभे राहावे लागले, बसायला जागा नव्हती. रस्त्यावर उभे राहूनच बसची वाट पाहायला लागल्याने दिव्यांग बांधवांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे याठिकाणी बस थांबा तसेच आसनाची सोय करावी, तसेच निवारा शेडही उभे करावे. 
- ज्ञानेश्वर शिंदे 

श्वास घ्यायचा तरी कसा.. 
या पद्धतीने "पीएमपी'च्या बसची देखभाल-दुरुस्ती असल्यास पुणेकरांचे आरोग्य नक्कीच धोक्‍यात येणार यात काहीच शंका नाही. 
- कुमार न्हावले 

Image may contain: 1 person, sky and outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The things that children do in the garden when it is dark