बोपोडीती तुंबलेले स्वच्छतागृह

अतुल गायकवाड 
Monday, 30 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे  : पुणे महापालिका औंध क्षेत्रीय कार्यालय बोपोडी, संजय गांधी आरोग्य कोठी यांच्यावतीने 34, मुंबई पुणे रस्ता, गोपीचाळ या वस्तीमधील सार्वजनिक स्वच्छतागृह रंगविण्याचे काम सुरू आहे. यानिमित्ताने "स्वच्छ सर्वेक्षण 2020' ची तयारी जोरात सुरू आहे. मात्र या स्वच्छतागृहात दहा दिवसांपासून खूप घाण झाली आहे. ते साफ करण्यासाठी येणारे वॉशिंग जेटी मशिन हे नादुरुस्त आहे, असे सांगणात येते. अनेकदा तक्रार देऊनही तेथे स्वच्छता केली जात नाही. खूप वेळा तक्रार केल्यानंतर स्वच्छतेसाठी कामगार येतात मात्र पाणीच नसल्याने त्यांना काम करता येत नाही. या भागात पाणी टंचाई आहे. स्वच्छतागृहाजवळ मोठी पाण्याची टाकी बसविण्यात आली व नळ जोडणीही केली पण जेथे दोन फूट उंचीला पाणी येत नाही तेथे 6 फूट उंचावरील टाकीत पाणी कसे टाकीत जाणार? अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या मात्र सामान्य नागरिकांची तक्रारी घेतल्या जात नाहीत. "स्वच्छता मोहीम -2020' राबविणारे महापालिका अधिकारी आणि परीक्षकांनी नक्की येथे भेट द्यावी म्हणजे कशी उधळपट्टी सुरू आहे, ते समजेल. आम्ही ही बाब, पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना कळवीत आहोत. उगाच उधळपट्टी का करताय? स्वच्छता मोहिमेत हे अपेक्षित नाही. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toilet blocked in Pune city