लोणकर शाळेजवळ बेवारस टपऱ्या 

सकाळ संवाद
Friday, 6 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

लोणकर शाळेजवळील बेवारस टपऱ्या 
महापालिकेने हटवाव्यात 

वडगाव शेरी : गावठाणात असलेल्या लोणकर शाळेलगत अनेक दिवसांपासून टपऱ्या बेवारस अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे नागरिकांना व वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिक कचरा टाकण्यासाठी या टपऱ्यांचा सध्या वापर करीत असून, कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तरी, महापालिकेच्या संबंधित विभागाने या बेवारस टपऱ्या लवकरात लवकर हटवाव्यात. 
- मधुर गलांडे 

Image may contain: one or more people, tree, plant, motorcycle and outdoor
 

मोकळ्या जागेतील मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांमुळे 
येवलेवाडीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर 

कोंढवा :  येवलेवाडी येथील ज्युबिलेशन सोसायटीच्या मोकळ्या जागेत मृतदेह जाळले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. पंधरा दिवसांहून अधिक काळ महापालिकेकडे तक्रार नोंदवली आहे. पण, प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही केली गेली नाही. बेकायदेशीरपणे मृतदेह जाळत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. 
- धन्यता जगताप 

Image may contain: one or more people, fire, outdoor and food
 

जेल रोडच्या पदपथांवरील 
खचलेले चेंबर दुरुस्त करावेत 

येरवडा : गोल्फ चौक ते नागपूर चाळ, जेल रोडलगत वनराई असल्याने स्थानिक नागरिक सायंकाळच्या वेळी फेरफटका मारायला जात असतात. परंतु, जेल रोडच्या दोन्ही बाजूच्या पदपथांवरील अनेक ठिकाणी चेंबर खचल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या पथ विभागाने या समस्यांकडे त्वरित लक्ष केंद्रित करून नागरिकांना चालण्यायोग्य पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावा, ही विनंती 
- मनोज शेट्टी 

Image may contain: shoes and outdoor
 

हडपसरमधील गाडीतळ चौकाला 
खासगी रिक्षाचालकांचा विळखा 

हडपसर : गाडीतळ चौकातील पीएमपीच्या डेपोजवळ नियमित खासगी रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे सोलापूर रस्ता अरुंद झालेला आहे. पुण्यावरून येणारी वाहने आणि बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उभ्या असलेल्या बसच्या मागेदेखील रिक्षा उभ्या असतात. पीएमपीचे स्टार्टर शिट्या मारून थकून जातात, तरी ते हलत नाही. डेपोच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर चार-चार रिक्षा उभ्या असतात. अनेकदा तक्रार केली असता "आम्ही हप्ते देतोय' असे गोंडस उत्तर दिले जाते. पोलिस यंत्रणा म्हणते "आम्ही हात टेकले आहेत'; मग नक्की गौडबंगाल काय आहे? सामान्य नागरिकांना हा रोजचा त्रास आहे. येथून जाताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. नागरिकांना पदपथावरूनही नीटपणे चालता येत नाही. आयुक्त कार्यालयाकडून फक्त आश्वासनेच मिळतात. पोलिसांनी तातडीने कार्यवाई करावी. 
- पंडित हिंगे 

Image may contain: one or more people, car and outdoor

गाडीतळाजवळील उद्यानावर 
नामफलक लावावे 

हडपसर : गाडीतळजवळील जमदाडे वखारीच्या काही जागेत महापालिकेने एक छोटीशी बाग उभी केलेली आहे. त्यामुळे या परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या दृष्टीने हा एक चांगला उपक्रम राबविण्यात आलेला आहे, त्याबद्दल महापालिका तसेच या परिसरातील नगरसेवक, आमदार यांचे हार्दिक अभिनंदन. तथापि, एक गोष्ट मात्र निदर्शनास आलेली आहे; ती अशी की उद्‌घाटनाच्या कापडी बोर्डवर "कै. अप्पासाहेब जमदाडे उद्यान' असे लिहिलेले असून, तो कापडी बोर्ड मात्र आता बाजूला पडलेला आहे आणि बागेतल्या बोर्डावर मात्र कशाचाही उल्लेख नाही. 
- प्रा. हिंगे 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic is getting hampered near Lonkar School