सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर पडले झाडाची फांदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सुवर्णरत्न सोसायटी येथील कॅनालजवळील मागील गल्लीतील सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर सोमवारी शेवग्याच्या झाडाची मोठी फांदी पडली, त्या खाली दोन चारचाकी वाहने अडकली आहेत. एक वयस्कर व्यक्तीचा सुदैवाने जीव वाचला. तेथील अशोक, शेवगा ही झाडे धोकादायक झाली आहेत. नारळाची दोन झाडे उच्च दाब वाहिन्यांलगत असून त्यांच्या फांद्या व नारळ रस्त्यावर पडून धोका संभवतो. सदर पडलेल्या फांदीबाबत संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांना कळविले असता प्रत्येकाने दुसऱ्यांचे मोबाईल क्रंमाक दिले. ५ ते ६ व्यक्तींना संपर्क करुही फांदी काढाण्यासाठी कोणीही आले नाही, याबाबत कोणी लक्ष देणार आहे का

Web Title: tree falls on the wall of the society