#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे
नागरिकांना नाहक त्रास
औंध : कस्तुरबा गांधी वसाहत गणेश खिंड येथे गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे अर्धवट काम करून ठेवले आहे; त्यानंतर येथील अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी इकडे कोणीही फिरकलेदेखील नाही. त्यामुळे येथे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
- कुमार सोनवणे
दिव्यांगाना होणाऱ्या अडचणींचा
विचार करून त्यांना योग्य मान द्या
पुणे : दिव्यांगाना दैनंदिन जीवनात दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो; दिव्यंगत्व ही समस्या केवळ पुस्तकी आशयांमधून न जाणून घेता ती समस्या प्रत्यक्षात पाहूनच समजून घ्या. काहीजण आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत. सरकारने ढिगभर योजना व सवलती जाहीर केल्या आहेत; मात्र त्या मिळविण्यासाठी ते देखील कागदच गोळा करत आहेत. ढिगभर कागदपत्रे गोळा करून सरकारच्या दरबारी अपूर्ण शेरा असल्याचे त्याच्या माथी मारले जाते. बस, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना ओळख पटवून दिल्याशिवाय त्यांचे अपंगत्व सिद्ध करता येत नाही; दिव्यंगत्व असल्याचे दिसत असूनदेखील ".. तू अपंग आहेस का' हे विचारणाऱ्यांची तर फारच किव करावीशी वाटते.
- ज्ञानेश्वर शिंदे
दिवस मोठा होत चालल्याने पथदिवे
सकाळी लवकरच बंद करावेत
पुणे : संक्रांतीनंतर हळू-हळू दिवस मोठा होत आहे. सकाळी सव्वा सहा वाजताच रस्त्यावर चांगला सूर्यप्रकाश पसरलेला असतो. त्यामुळे रस्त्यावरील दिवे सकाळी सव्वा सहालाच बंद होतील, अशी व्यवस्था करावी. त्यामुळे पुणे महापालिकेच्या वीज खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.
- अनिल दुरुगकर