विद्यानगर परिसरातील  वृक्षतोडीची चौकशी व्हावी 

सकाळ संवाद
Thursday, 12 March 2020

फुरसुंगी लोहमार्ग पुलाखालील 
रस्ता अखेर खुला 

हडपसर : जुन्या सासवड रस्त्यावरील फुरसुंगी जवळील लोहमार्ग पुलाखालील रस्ता "सकाळ संवाद'मधील बातमीनंतर तत्परतेने सुरू केल्याबद्दल "सकाळ' व संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. 
हा रस्ता खुला केल्यामुळे काळे पडळ रेल्वे गेटवरील वाहतुकीचा ताण नक्कीच कमी होणार आहे. रस्ता थोडासा समतल करून दिल्यास 
वाहनचालकांना दिलासा मिळेल, प्रशासनाने यात लक्ष घालावे, ही विनंती. 
-दीपक कुलकर्णी 

फुरसुंगी लोहमार्ग पुलाखालील 
रस्ता अखेर खुला 

हडपसर : जुन्या सासवड रस्त्यावरील फुरसुंगी जवळील लोहमार्ग पुलाखालील रस्ता "सकाळ संवाद'मधील बातमीनंतर तत्परतेने सुरू केल्याबद्दल "सकाळ' व संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. 
हा रस्ता खुला केल्यामुळे काळे पडळ रेल्वे गेटवरील वाहतुकीचा ताण नक्कीच कमी होणार आहे. रस्ता थोडासा समतल करून दिल्यास 
वाहनचालकांना दिलासा मिळेल, प्रशासनाने यात लक्ष घालावे, ही विनंती. 
-दीपक कुलकर्णी 

Image may contain: bridge and outdoor
 

मगरपट्ट्यातील लोकमान्य बॅंकेसमोर 
दीड महिन्यांपासून पाणीगळती 

हडपसर : मगरपट्ट्यातील लोकमान्य बॅंकेसमोर, शांती निकेतन इमारतीलगत मागील दीड महिन्यापासून पाणी गळती होत आहे. 
याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार देखील केली आहे, परंतु तक्रारीला 45 दिवस झाले आहेत, तरी अद्याप गळती थांबलेली नाही. आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी 
-श्रेयस पाटील 


 

विद्यानगर परिसरातील 
वृक्षतोडीची चौकशी व्हावी 

विश्रांतवाडी : विद्यानगर रोड नंबर सात या ठिकाणी महापालिका शिक्षण मंडळाच्या गेनबा मोझे आणि सरस्वती विद्यामंदिर या शाळा आहेत. दोन्ही शाळांसाठी एकाच सिमाभिंतीत सामाईक मैदान आहे. सदरहू मैदानाच्या चोहोबाजूंनी अनेक झाडे लावण्यात आलेली होती, ही सर्व झाडे साधारणपणे तीन फुटांपर्यंत वाढलेली असताना अचानकपणे तोडण्यात आलेली आहेत. एकीकडे "झाडे लावा झाडें जगवा,' अशा घोषणा करायच्या आणि दुसरीकडे वृक्षतोड करायची. ही सार्वजनिक निधीची उधळपट्टी आहे. संपूर्ण वृक्षतोडीची चौकशी व्हावी. 
-सुरेश सातपुते 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Vidyanagar area There should be inquiries from the trees