रिक्षाचालाकाकडून नियमांचे वाहतूक उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : परिंचे (ता.पुरंदर) भागात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना या भागातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यामध्ये भर म्हणून एका रिक्षाचालकाने तीन आसनी रिक्षा कायद्याचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत होता. त्यासाठी त्याने रिक्षाच्या रचनेत बदल केला असून, त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहतूक करत होता. त्याच्याकडून आरटीओच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराकडे पोलिसांचे व वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

संबंधित रिक्षाचालक प्रवाशांच्या जीवनाशी खेळत आहे. तरीदेखील यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने पैसे घेणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीसंख्या भरणे. तसेच प्रवाशांना नाहक त्रास देताना दिसत आहे. रिक्षाचालकांना आरटीओने काही नियम ठरवून दिलेले असताना या रिक्षाचालकाकडून कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: violation of Traffic rules by the auto rickshaw driver