कोथरूड येथे कचऱ्याची समस्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: कोथरूड-कर्वे रस्त्याच्या बाजूच्या कालवा रस्त्यावर यश एलिना सोसायटीच्या समोर कचरा साठला आहे. एका ठिकाणी कचरा साठला की नागरीकही त्या ठिकाणी कचरा फेकतात. कचरा कुजेपर्यंत तो ऊचलला जात नाही. कचर्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते. सोसायटीतील आणि जाणारे येणारे नागरीक यांना याचा खूप त्रास होतो. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात तरी महापालिकेने सर्व कचरा उचलावा. ये जा करणाऱ्या नागरीकांनाही विनंती आहे की कुठेही रस्त्यावर कचरा फेकू नका. नागरीकांनीच कचरा विल्हेवाट योग्य प्रकारे लावली नाही तर शहर स्वच्छ होणार नाही. फक्त महापालिकेचीच नाही तर नागरीकांचेही हे प्रथम कर्तव्य आहे. स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत पुण्याचा क्रमांक सातत्याने घसरत आहे. या घसरणीला आपणही कारणीभूत आहोत का? याचाही विचार करण्याची गरज आहे. इंदूर सारखे शहर सलग तिसर्या वर्षी संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावते यात तेथील नागरीकांचा मोलाचा वाटा आहे. नागरिकांच्या सहभागाशिवाय एकटी महानगरपालिका एवढे मोठे काम करू शकणार नाही.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waste problem at Kothrud