#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
एसएनडीटी परिसरात पाणी गळती
एरंडवणा : एसएनडीटी कॉलेजसमोरून कोथरूडकडे जाणाऱ्या कालवा रस्त्यावर पाण्याची गळती होत आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाहणी करून हा व्हॉल्व्ह दुरुस्त करून गळती थांबवावी. पुण्याच्या काही भागात रोज अपुरा पाणीपुरवठा होत असताना अशा गळतीमुळे पाणी वाया जाणे योग्य नाही.
- शिवाजी पठारे
डीपी रस्त्यावरील सिंफनी हॉलजवळ
ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारावे
हडपसर : गाडीतळाच्या पुढे डीपी रस्त्यावरील सिंफनी हॉलजवळ कचऱ्याचे ढीग साचले आहेत. येथे वाढलेल्या प्रचंड गवतामुळे डासांचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. महापालिकेची कचरा गाडी येते. पण, त्यांच्या निदर्शनास हे ढीग कदाचित येत नसावेत. येथे ज्येष्ठांसाठी विरंगुळा पार्क तयार केल्यास याचा चांगला उपयोग होईल. तरी याकडे स्थानिक नगरसेवक, आमदारांनी लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- पंडित हिंगे
कोथरूड : कोथरूडमधील जीत मैदानावर असलेल्या विजेच्या खांबावरील डीपी बॉक्स उघडे असल्याने धोका निर्माण होत आहे. परिसरात अनेक लहान मुले खेळण्यासाठी
जमा होतात. त्यामुळे मुलांना विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे. प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
- आनंद कांबळे