जलवाहणीचा गटारातून प्रवास

विजय अडागळे 
बुधवार, 27 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून बी. टी. कवडे रस्ता परिसर, भीमनगर, जहांगीर नगर, सोपान बाग, मगरपट्टा ते अगदी हडपसरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वाहिनी लहान कालव्यामधून आणण्यात आली आहे. मात्र या कालव्यामध्ये सांडपाणी, कचरा साचलेला असून त्याला गटाराचे स्वरूप आलेले आहे. यामध्ये सांडपाणी आणि कच-याचे प्रमाण खूप मोठे असून येथील पाण्याला दुर्गंधी आलेली आहे. याच गटारातून या उच्चभ्रू परिसराला पाणीपुरवठा केला जात असल्याने, येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. 

या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सांडपाण्यामध्ये डासांची संख्याही वाढलेली आहे. अद्याप या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात आलेली नाही, असा येथील आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कवडे, सचिन दळवी यांनी केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी सबंधित ही समस्या असूनही, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथे स्वच्छता करावी आणि या जलवाहिन्या लहान (बेबी) कालव्यातून हालावाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

Web Title: water pipe through gutter