पूर्वलक्ष्यी करवसुली कशासाठी? 

शुक्रवार, 26 जुलै 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  #SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : मिळकतकरावरील 45 टक्‍क्‍यांची सवलत रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने पालिकेला दिला असून, त्याची वसुली 2011 पासून होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना या वर्षी पुन्हा पालिकेला मिळकतकर द्यावा लागणार आहे असे दिसते. खरे तर राज्य शासनाने ही सवलत रद्द करण्याचा आदेश पालिकेला 2012-13 ला दिला होता. परंतु पालिका अधिकाऱ्यांनी व सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व आता 2011 पासून वसुली होणार आहे. याला करदाते दोषी कसे? कदाचित थोड्या दिवसांनी त्यावर व्याज पण लावावे, असा आदेश येईल. कारण अनेकांना माहिती पण नाही की आपण जो बिगरशेती कर भरतो त्यावरदेखील सरकारने अशीच 2001 पासून पूर्वलक्ष्यी वसुली चालू केली असून त्यावर 19 वर्षाच्या व्याजासकट लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. यावर कुठलाही पक्ष किंवा आमदार आवाज उठवायला तयार नाही हे दुर्दैव आहे. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune