#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
पुणे : स्वच्छ पुणे अभियानाच्या फलकावरील शुद्धलेखन अधिकाऱ्यांनी न तपासल्यामुळे विद्येच्या माहेरघरी मराठीचा वाईट अवस्था झाली आहे.
- कुमार करकरे
"गणेश नक्षत्रम'मध्ये वृक्षवाटप
धायरी : धायरीतील गणेश नक्षत्रम सोसायटीच्या महिलांनी पर्यावरणीय दृष्टिकोनातून रोपांचे वाटप केले. याला परिसरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- राहुल साळवी
एरंडवण्यात बेकायदा पार्किंगचे पेव
एरंडवणा : शारदा सेंटर, एरडवणे येथे नेहमी पार्किंगच्या नियमांची पायमल्ली होत आहे. पार्किंग पी-1 पी-2 आहे; मात्र वाहने दोन्ही बाजूला उभी असतात. मेट्रोचे
काम
सुरू असल्याने रहदारी जास्त आहे. त्यामुळे रोज लांबच्या लांब रांग असतात. वाहतूक शाखा जवळपास आहे; मात्र या ठिकाणी कोणीच लक्ष देत नाही. नागरिकांना
नाहक त्रास सहन करावा लागतो.
- अनंत गजमल
शिलाविहार कॉलनीत बेवारस मोटार
कोथरूड ः शिलाविहार कॉलनी, पौड फाटा येथे मागील चार महिन्यांपासून अज्ञात वाहन उभे आहे. या गाडीमुळे लोक कचरा टाकतात. यामुळे डासांची पैदास होते.
त्यामुळे पोलिस व महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.
- प्रियंका सातपुते