
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
विद्येच्या माहेरघरी अशुद्ध लेखन
कात्रज : कात्रज चौकातील दिशादर्शक फलकावर "कोंढवा' ऐवजी "कोंडवा' असे लिहिले आहे. महापालिकेने यात तातडीने दुरुस्ती करून घ्यावी.
- अमर खोपडे
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी
ओंकार खेडेकरची निवड
मांगडेवाडी : येथील रहिवाशी विनय खेडेकर यांचे चिरंजीव ओंकार खेडेकर याची कोल्हापूर येथे होणाऱ्या 43 वी ज्युनिअर राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वी त्याने पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले होते. त्यामुळे ही निवड झाल्याचे मत त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले. ओंकार याच्या निवडीवर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- विकास गुरव
वीट बसथांबा येथे कचऱ्यामुळे
डुकरांचा वावर वाढला
अप्पर : वीट बसथांबा येथे पूनम गार्डन सोसायटी समोरून जो रास्ता ओढ्याला जातो, तिथे खूप कचरा टाकला जातो. कचऱ्यामुळे तेथे डुकरे जमतात. पादचारी मार्गावरून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर ते धावून जातात. त्यामुळे तेथून चालण्यास भीती वाटते. महापालिकेने तातडीने हा कचरा उचलावा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा.
-र. शिंगाडे
खेड शिवापूर टोक नाका बंदची मागणी
सातारा रस्ता : रविवारी खेड शिवापूर टोल नाक्यावरील सर्व रांगांमध्ये रोख रक्कम स्वीकारली जात होती. हा टोल नाका शासनाच्या आदेशाचे पालन करीत नाही. त्यामुळे तो कायमचा बंद करण्याची आवश्यकता आहे.
- ईशान मिरशी
बेवारस वाहनांमुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला हरताळ
नारायण पेठ : सर्व्हे नंबर 133 चैतन्य हॉस्पिटलसमोर बेवारस वाहने पडून आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला हरताळ फासला जात आहे. देशभरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. त्यासाठी प्रशासन प्रचार व प्रसार करत आहे; पण नीलायमच्या पुलापासून, सिंहगड रस्त्याकडे वळताना सर्व्हे नंबर 133 चैतन्य हॉस्पिटलसमोर मात्र अनेक दिवसांपासून बेवारस वाहने पडून आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापरच करता येत नाही. या वाहनांवर धूळ जमा होऊन स्थानिक नागरिक या ठिकाणी कचरा टाकत आहेत. यामुळे या परिसरात आपोआप कचराकुंडी तयार झाली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे स्वच्छता
होत नाही. बेवारस वाहनांची विल्हेवाटदेखील लावली जात नाही. शहरात चारचाकी पार्किंग व दुचाकी पार्किंग असे फलक पी 1 व पी-2 असे लावल्यास गाड्या दररोज हलविल्या जातील व महानगर पालिका कर्मचाऱ्यांना साफसफाई
(झाडकाम) करता येईल. अशाने शहर स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल.! याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केल्यास स्वच्छ सर्वेक्षण मोहीम यशस्वी होण्यात कोणतीही बाधा येणार नाही.
- अनिल अगावणे
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune