esakal | अक्षरशः तक्रारींचा पाऊस; पोलिसांकडे १३ लाख दूरध्वनी कॉल
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown-Hyderabad

लॉकडाउनच्या काळात हजारो व्यक्तींनी १०० क्रमांकावरून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्याचे तेलंगण पोलिसांनी सांगितले. कोरोनाव्हायरसमुळे देशात २१ मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाले. तेव्हापासून १३ लाख ३४ हजार ३३० असे विक्रमी कॉलची नोंद झाली आहे.

अक्षरशः तक्रारींचा पाऊस; पोलिसांकडे १३ लाख दूरध्वनी कॉल

sakal_logo
By
आर. एच. विद्या

हैदराबाद - लॉकडाउनच्या काळात हजारो व्यक्तींनी १०० क्रमांकावरून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्याचे तेलंगण पोलिसांनी सांगितले. कोरोनाव्हायरसमुळे देशात २१ मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाले. तेव्हापासून १३ लाख ३४ हजार ३३० असे विक्रमी कॉलची नोंद झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दूरध्वनीवरून तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी राज्यातील गुन्हेगारीत मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. हैदराबाद, सायबराबाद आणि रांचाकोंडा आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रेटर हैदराबाद आणि उपनगरांमध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या तुलनात्मकदृष्टिने कमी आहे. लॉकडाउनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण ५६ टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले. यात घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. हैदराबाद, सूर्यापेट आणि अदिलाबाद जिल्ह्यांत काही प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

पोलिस नियंत्रण कक्षातील नोंदींनुसार साधारण ८४ हजार १२३ दूरध्वनी कॉल हे लॉकडाउन आणि कोरोनासंदर्भात विचारणा करणारे होते. विशेष म्हणजे विदेशातून परलेल्यांची व कोरोना संशयितांची माहिती देणारे कॉलची संख्याही मोठी आहे. यातील माहितीमुळे पोलिसांना काही व्यक्तींवर निर्बंध आणले आणि त्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने असे काही कॉल पोलिसांसाठी उपयुक्त ठरले.

दूरध्वनी कॉल व महत्त्वाची कारणे

  • १३, ३४,३३० - २१ मार्चपासूनची एकूण संख्या
  • ८४,१२३ - लॉकडाउन व कोरानाची माहिती घेण्यासाठी
  • २१, ७५८ - लॉकडाउन न पाळणाऱ्यांची माहिती देणारे

गुन्‍ह्यांमध्ये घट (टक्क्यांत)

  • ५६ - सरासरी प्रमाण
  • ९४ - चोरीचे गुन्हे
  • ९० - अपहरणाचे गुन्हे
  • ७५ - बेपत्ताच्या तक्रारी