Coronavirus : धक्कादायक ! एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
Sunday, 19 April 2020

एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याने दिल्ली आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील जहाँगीरपुरी परिसरात हे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.

नवी दिल्ली : एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याने दिल्ली आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील जहाँगीरपुरी परिसरात हे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू असताना ही घटना सरकार आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत भर टाकणारी आहे. दिल्लीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण दिल्लीत ७६ कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील दक्षिण दिल्लीतील सी ब्लॉकमध्ये असलेल्या जहाँगीरपुरीतही कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबातील २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

काही कंटेनमेंट झोनमध्ये लोक रस्त्यावर फिरत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर घराबाहेर न पडण्याची सूचना केलेली असताना शेजाऱ्यांच्या घरीही लोक जात आहेत. त्यात जहाँगीरपुरी झोनमध्ये २६ जणांना करोना झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे. हे सर्व बाधित एकाच कुटुंबातील असून याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्यानंतरही हे लोक एकमेकांच्या घरी गेल्यानं करोनाचा संसर्ग झाला आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

Coronavirus : कोरोनामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू 

दिल्लीत आरोग्य विभागानं सामूदायिक तपासणी सुरू केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या नागरिकांच्या तपासण्या सध्या करण्यात येत आहेत. जहाँगीरपुरी कंटेनमेंट झोनमधील ६० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात ३१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र, आरोग्य विभागाला धक्का तेव्हा बसला जेव्हा ३१ पैकी २६ जण एकाच कुटुंबातील निघाले. ३१ करोनाबाधित रूग्णांमध्ये १८ महिला, १२ पुरूष आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. १२ जण १० ते १९ वयोगटातील आहेत. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. याच कुटुंबातील एका ६० वर्षीय महिलेचा करोनामुळे ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे, असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 Of A Family Tested Corona Positive In Delhis Jahangirpuri