दिलासादायक! कोरोनाचे ४८ रुग्ण पूर्ण बरे

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

रुग्णांची संख्या होतीये कमी

- मंगळवारी १३ रुग्णांना डिस्चार्ज

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरात ५५० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. परंतु, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. त्यामुळे या व्हायरसला घाबरण्याचे कारण नाही मात्र सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या देशात ५५० कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या कोरोनाग्रस्तांवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे देशाच्या विविध भागातील कोरोनाबाधित ४८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ते यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

रुग्णांची संख्या होतीये कमी

सरकारच्या उपायोजनांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी ९९ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातुलनेत मंगळवारी ६४ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मंगळवारी १३ रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात असून, यातील १३ रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आधीच कोरोनामुळे चिंतेत असलेल्या नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 Coronavirus Patient Discharged From Hospital In India

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: