Coronavirus : कोरोनामुळे पोलिस इन्सपेक्टरचा मृत्यू

वृत्तसंस्था
Sunday, 19 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना देशात 24 तासांत कोरोनामुळे दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मध्यप्रदेशातील इंदूर इथे 48 वर्षीय टीआयई देवेंद्र चंद्रवंशी यांचा मृत्यू झाला आहे. ते इंदूर इथे जुनी पोलिस स्थानकात कार्यरत होते. देवेंद्र यांच्यावर कोरोनासोबतच न्यूमोनियाचे उपचार सुरू होते. 15 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.

इंदूर (मध्यप्रदेश) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना देशात 24 तासांत कोरोनामुळे दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मध्यप्रदेशातील इंदूर इथे 48 वर्षीय टीआयई देवेंद्र चंद्रवंशी यांचा मृत्यू झाला आहे. ते इंदूर इथे जुनी पोलिस स्थानकात कार्यरत होते. देवेंद्र यांच्यावर कोरोनासोबतच न्यूमोनियाचे उपचार सुरू होते. 15 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली, त्यानंतर काल (ता. १८) शनिवारी रात्री उशिरा त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य सेवा, परिचारिका आणि त्यांच्यासोबत पोलिसही अहोरात्र ड्युटी करत आहेत. याच अत्यावश्यक सेवेत असलेल्यांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. त्यात देशात दोन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल (ता. १८) पंजाबमधील लुधियाना शहरातील सहायक पोलिस आयुक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Coronavirus : कोरोनामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

कोरोनामुळे पंजाबमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल कोहली यांचा मृत्यू झाला होता. पंजाबमधील रुग्णालयात कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे. 52 वर्षांच्या कोहली यांना 8 एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48-year-old Indore police inspector dies of Coronavirus