Coronavirus : लॉकडाऊनचे नियम मोडल्याने तब्बल 78 हजार जणांना अटक

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

महाराष्ट्रातही काही ठिकाणी वाहने जप्त

- ५९ हजार वाहने जप्त

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत १२ लाखांहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 60 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वच व्यवहार बंद आहेत. असे असतानाही काहीजण लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे तब्बल 78 हजार जणांना अटक करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, आता विविध राज्यांत लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे. तसेच आता तमिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Coronavirus In Delhi: India has an innate, natural defence against ...

तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनाबधित रुग्णांचा आकडा आटोक्यात होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तमिळनाडूतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. ही रुग्ण संख्या 485 वर गेली आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच आता तमिळनाडू सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

७८ हजार अटकेत 

तमिळनाडू सरकारने नियम मोडणाऱ्या बेशिस्तांविरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तमिळनाडूमध्ये लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याबरोबरच लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी 71 हजार 204 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Anti-Sterlite

५९ हजार वाहने जप्त

तमिळनाडू सरकारने धडक मोहीम हाती घेतली असून, यामध्ये ७८ हजार नागरिकांना अटक केली तर 59 हजार 868 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

Tamil Nadu: 3 employees of Chennai mall test positive for Covid-19 ...

महाराष्ट्रातही काही ठिकाणी वाहने जप्त

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही विविध ठिकाणी वाहने जप्त करण्यात आली आहे. तर काहींवर गुन्हे दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 78707 Peoples Arrested who Break Law Of Lock Down in Tamil Nadu