esakal | Coronavirus : औवेसींनी पहिल्यांदाच केले मोदी सरकारचे कौतुक; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

asaduddin owaisi welcome Modi govt decision about plasma therapy decision

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेबरोबरच विविध संस्था कोरोनावर उपचार शोधण्याचं काम करत असून, कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा उपचार पद्धतीचा चांगला परिणाम दिसून येत आहे. या पद्धतीचा अधिक वापर करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. मोदी सरकारच्या याच निर्णयाचं एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी यांनी कौतुक केलं आहे.

Coronavirus : औवेसींनी पहिल्यांदाच केले मोदी सरकारचे कौतुक; म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैद्राबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेबरोबरच विविध संस्था कोरोनावर उपचार शोधण्याचं काम करत असून, कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा उपचार पद्धतीचा चांगला परिणाम दिसून येत आहे. या पद्धतीचा अधिक वापर करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. मोदी सरकारच्या याच निर्णयाचं एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी यांनी कौतुक केलं आहे. हा चांगला निर्णय असल्याचं सांगत मुस्लीम समुदायातील लोकांना यासाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. औवेसी यांनी यासंदर्भात ट्विट करून भूमिका मांडली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी (रक्तद्रव उपचार पद्धती) कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना महत्त्वाची ठरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर ही उपचार पद्धती वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तद्रवाचा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर ते लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. या पद्धतीचा उपचारात वापर केल्यानं अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या घटना दिसून आल्या. त्यानंतर केंद्र सरकारनं कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने रेड क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांना विनंती केली आहे की, त्यांनी करोनामुक्त झालेल्या रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावं.
 

औवेसी या निर्ययानंतर म्हणाले की, 'हा चांगला निर्णय आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी समोर येऊन रक्तदान करावं. विशेषतः कोरोनामुक्त झालेल्या मुस्लीम नागरिकांनी रेड क्रॉसच्या स्वयंसेवकांशी संपर्क करावा आणि रक्तदान करावं. असंख्य भारतीयाचं तुम्ही प्राण वाचवणार आहात, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं औवेसी यांनी म्हटलं आहे. 

बीड जिल्हा कोरोनापासून दूर ठेवणार - धनंजय मुंडे

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच संसर्ग झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी देशपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर अद्यापही औषधाचा शोध लागलेला नाही. मात्र, कोरोनाग्रस्त रुग्ण बरा करण्यासाठी कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी महत्त्वाची ठरु आहे.

loading image