#Lockdown2.0 : मंदीर उघडण्याबाबत बद्री-केदारनाथ मंदिरांचा मोठा निर्णय

पीटीआय
Monday, 20 April 2020

मंदीर उघडण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टच्या नव्या निर्णयानुसार बद्रीनाथ मंदिराची कवाडं आता १५ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडणार आहेत. तर, केदारनाथ मंदिराचे द्वार हे एक दिवस आधी, म्हणजेच १४ मे रोजी उघडणार आहेत. दरम्यान, गंगोत्री आणि यमुनोत्रीधाम ठरलेल्या तारखांनाच म्हणजे २६ एप्रिललाच खुले होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे, याबातचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नवी दिल्ली - मंदीर उघडण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टच्या नव्या निर्णयानुसार बद्रीनाथ मंदिराची कवाडं आता १५ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडणार आहेत. तर, केदारनाथ मंदिराचे द्वार हे एक दिवस आधी, म्हणजेच १४ मे रोजी उघडणार आहेत. दरम्यान, गंगोत्री आणि यमुनोत्रीधाम ठरलेल्या तारखांनाच म्हणजे २६ एप्रिललाच खुले होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे, याबातचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालाधी आणखी वाढवण्यात आला. ज्यानुसार आता ३ मे रोजी देशातील ल़ॉकडाऊन शिथिल केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणून बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांचे द्वार उघडण्याच्या तारखाही बदलण्यात आल्या आहेत. हा निर्णय येण्यापूर्वी, बद्रीनाथ मंदिराची कवाडं ३० एप्रिल रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भाविकांसाठी खुली होणार होती.

चारधाम यात्रेतील अत्यंत महत्त्वाची अशी केदारानाथ आणि बद्रीनाथ मंदिरं येत्या काळात नेमकी कोणत्या तारखेला उघडणार याचीच उत्सुकता अनेकांना होती. ती उत्सुकता प्रशानाने संपवली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचं देशभरात सुरु असणारं थैमान पाहता या पार्श्वभूमीवर आता याचे थेट पडसाद हे चारधाम यात्रेवर दिसून येऊ लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Badrinath temple reopen on 15th May and Kedarnath temple reopen on 14th May

Tags
टॉपिकस
Topic Tags: