Coronavirus : बेफिकीर रुग्ण सर्वाधिक धोकादायक

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 April 2020

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ‘आयसीएमआर’च्या पाहणीनुसार, एक कोरोनाग्रस्त इसम सोशल डिस्टन्ससिंगचे नियम धुडकावून समाजात फिरत राहतो तेव्हा तो किमान ४०६ लोकांना कोरोनाच्या जीवघेण्या संकटात ढकलतो, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवले आहे.

नवी दिल्ली - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ‘आयसीएमआर’च्या पाहणीनुसार, एक कोरोनाग्रस्त इसम सोशल डिस्टन्ससिंगचे नियम धुडकावून समाजात फिरत राहतो तेव्हा तो किमान ४०६ लोकांना कोरोनाच्या जीवघेण्या संकटात ढकलतो, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी जमात या धार्मिक संस्थेच्या मेळाव्याला हजर राहिलेले लोक देशभर फिरताहेत. या संस्थेचा प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्यासह अनेक जण फरार झाले आहेत. यातील बहुतांशी लोक दिल्लीतून विविध राज्यांमध्ये गेले आणि तेथे कोरोनाचा एकदम उद्रेक झाला असेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे. भारत कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात  जाऊच नये, यासाठी सरकार सज्ज आहे आणि लॉकडाउनच्या काळात केलेल्या उपाययोजनांमुळे भारत तिसऱ्या टप्प्यात जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यास पुरेपूर वाव आहे, असे मत ‘आयसीएमआर’चे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, ही भविष्यवाणी नसून वेळीच केलेल्या उपायांमुळे भारतात सध्या विकसित आणि प्रगत देशांपेक्षा सकारात्मक परिस्थिती निर्माण करण्यासारखे संकेत आहेत.

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने ३०००० विलगीकरण उपचार कक्ष  सज्ज केले आहेत.

रेल्वेच्या वापरात असलेल्या- नसलेल्या मिळून २५०० डब्यांमध्ये हे वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये दररोज आणखी ३७५ वैद्यकीय कक्ष तयार करणे भारतीय रेल्वेने सुरू ठेवले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careless patients most dangerous