Coronavirus : देशवासींयाचे कार्य एखाद्या योद्ध्याप्रमाणे : पंतप्रधान मोदी; लॉकडाउनही वाढला

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना देशात लॉकडाऊन वाढवला असून तो ०३ मेपर्यंत करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाउनमध्ये १९ दिवसांची वाढ केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले.

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना देशात लॉकडाऊन वाढवला असून तो ०३ मेपर्यंत करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाउनमध्ये १९ दिवसांची वाढ केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशवासी एखाद्या योद्ध्याप्रमाणे कार्य करत आहेत. तुम्हाला किती त्रास होतो आहे याची मला कल्पना आहे. तुम्हीच भारताला वाचवलंय, मी सर्वांना नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने करोना रोखण्यासाठी जास्त प्रयत्न केले. यामध्ये तुम्हीदेखील मदत केली. कोरोनाचा एकही रुग्ण नसताना भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरु केली होती. १०० पर्यंत पोहोचण्याआधी परदेशी नागरिकांना आयसोलेशन होण्यास सांगण्यात आलं होतं. ५५० प्रकरणं असताना २१ दिवसांचा लॉकडाउनचा मोठा निर्णय जाहीर केला. भारताने समस्या वाढेल याची वाट पाहिली नाही. समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन त्याचेवळी रोखण्याचा प्रयत्न केला असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

इतर देशांशी तुलना करणं योग्य नाही. पण भारताच्या तुलनेत त्यांची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. भारताने योग्य पावलं उचलली नसती, वेळेवर निर्णय घेतले नसते तर आज भारताची स्थिती काय असती याची कल्पनाच करवत नाही, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. भारताने घेतलेल्या निर्णयांची आज जगभरात चर्चा सुरु आहे असं यावेळी मोदींनी म्हटलं.

Coronavirus : सुंदर पिचाईंची भारताला ०५ कोटींची मदत

दरम्यान, मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच, ओडिशा, आसाम, ईशान्य भारतामधील राज्ये, केरळ, कर्नाटकमध्ये आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पना संक्रांती, ज्याला महाविशुबा संक्रांती म्हणून देखील ओळखले जाते हा सण आज खास करुन ओडिशामध्ये साजरा केला जातो. सौर कालगणनेनुसार हा मेशाच्या पारंपारिक महिन्याचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आज तामीळ लोकांचे नवीन वर्ष सुरु होते. या उत्सवाला पुथांडू असे म्हणतात. ही कालगणनाही सुर्यावर आधारितच असते. आसामबरोबरच ईशान्य भारतामधील अनेक राज्यांमध्ये आजचा दिवस बोहाग बिहू म्हणून साजरा केला जातो. या सर्वांनी मोदीजींनी उत्सवाच्या शुभेच्छा देत कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला नक्की विजय मिळेल असे म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collective Strength Shown by Indians Against Coronavirus a Tribute to Ambedkar Says PM Modi