Coronavirus : खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचणी होणार मोफत

पीटीआय
Thursday, 9 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी शुल्क आकारण्यात येत अाहे. त्यामुळे ही चाचणी मोफत करण्याची व्यवस्था करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला केली. तसेच या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने डॉक्टरांना योद्ध्याची उपमा देत त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही केंद्राला दिले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी शुल्क आकारण्यात येत अाहे. त्यामुळे ही चाचणी मोफत करण्याची व्यवस्था करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला केली. तसेच या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने डॉक्टरांना योद्ध्याची उपमा देत त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही केंद्राला दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) अधिकृत खासगी प्रयोगशाळांना कोरोनाच्या चाचणीसाठी मंजुरी दिली होती. त्याचबरोबर प्रत्येक चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपये शुल्कही निश्चित करण्यात आले होते. यात ३ हजार रुपये तपासणी शुल्क आणि १ हजार ५०० रुपये स्क्रीनिंग असा समावेश आहे. यानंतर एका याचिकाकर्त्याने तपासणीसाठी पैसे आकारण्यात येत असल्याबद्दल याचिका दाखल होती. सुनावणीत सर्वोच्च  न्यायालयाने चाचणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगत कोरोना विषाणूची तपासणी खासगी प्रयोगशाळेमध्येही मोफत व्हावी यासाठी योग्य ते आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने म्हटले. 

तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट्सची कमतरता जाणवत असल्याने त्यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या याचिकेवरही सुनावणी करण्यात आली.  न्यायालयाने म्हटले, की कोरोना विषाणूदरम्यान डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. हे योद्धा आहेत आणि त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा खूप गरजेची आहे. त्यांना आवश्यक असलेल्या पीपीई किट्स लवकर पुरवल्या जाव्यात. यावर केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing in private labs will be free of charge