इटलीनंतर युरोपमधल्या 'या' देशात परिस्थिती बिघडली; मृतांची संख्या चीनच्या पुढे

वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

चीनमधून इटलीत वेगानं पसरलेल्या कोरोना व्हायरसने आता युरोपमधल्या इतर देशांना दणका दिलाय. सध्या इटली पाठोपाठ जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स या देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होत आहे. सध्याच्या घडीला युरोपमध्ये इटलीनंतर सर्वाधिक मृत्यू स्पेनमध्ये झाले आहेत. धक्कादायक बाब ही की, स्पेनमधील मृतांच्या संख्येनं आता चीनला ही मागं टाकलंय.

मद्रिद (स्पेन Coronavirus) : चीनमधून इटलीत वेगानं पसरलेल्या कोरोना व्हायरसने आता युरोपमधल्या इतर देशांना दणका दिलाय. सध्या इटली पाठोपाठ जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स या देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण होत आहे. सध्याच्या घडीला युरोपमध्ये इटलीनंतर सर्वाधिक मृत्यू स्पेनमध्ये झाले आहेत. धक्कादायक बाब ही की, स्पेनमधील मृतांच्या संख्येनं आता चीनला ही मागं टाकलंय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चोवीस तासांत 738 बळी
कोरोनाच उद्रेक चीनमध्ये झाला. गेल्या आठवड्याभरापासून चीनमधील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. पण, आता युरोपमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झालीय. इटलीपाठोपाठ स्पेनमधील मृतांची संख्या तीन हजारांच्या वर गेली असून, ती 3 हजार 434 झाली आहे. हा आकडा, चीनमधील मृतांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत नव्यानं लागण झालेल्यांची संख्या कमी असल्यानं तिथं आशादायक चित्र निर्माण झालंय. पण, स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत 738 जणांनी प्राण सोडल्याचं वृत्त गार्डियननं दिलंय. आपण, या व्हायरसच्या उद्रेकाच्या जवळ पोहोचलो नसलो तरी, आपण त्याच्या खूप जवळ आहोत, असं स्पेनच्या आरोग्य विभागातील इमर्जन्सी खात्याचे अधिकारी फर्नांडो सिमोन यांनी म्हटलंय. 

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा ! 

इटली सावरली पण...
इटलीमधील परिस्थिती थोडी फार सावरली असली तरी, इटलीतील मृतांची संख्या मंगळवारी 743ने वाढली आहे. इटलीत एकूण 6 हजार 820 जणांचा बळी गेला आहे. इटलीने चीनला कधीच मागे टाकले आहे. एखाद्या साथीच्या रोगाने इटलीच नव्हे तर युरोपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण, सध्या इटलीत नव्यानं लागण होण्याची संख्या कमी झाली आहे. देशभरातील लॉक डाऊनमुळं इटलीला साथ आटोक्यात आणण्यात यश येत असल्याचं सांगितलं  जातयं. इटलीतील आरोग्य खात्यासाठी ही खूपच दिलासा दायक आणि उत्साह वाढवणारं आहे. कारण, गेल्या आठवड्यातील इटलीची परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली होती. 

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

स्पेनमध्ये इतके मृत्यू का?
इटलीतील आरोग्य सुविधा जगातील सर्वोत्तम सुविधांपैकी एक मानल्या जात होत्या. पण, तरीही तेथे कोरोनामुळं मोठ्या प्रमाणावर बळी गेले. अर्थात बळी गेलेल्यांमध्ये वयोवृद्धांची संख्या सर्वाधिक असून, त्यांना आधीच इतर आराज होते, असं सांगितलं जातंय. दुसरीकडं स्पेनमध्ये मृतांची संख्या वाढण्यामागं तेथील आरोग्या सुविधा कारणीभूत आहेत. स्पेनमध्ये सध्याच्या घडीला 47 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय. पण, या संख्येच्या केवळ 14 टक्के मनुष्यबळ त्यांच्या आरोग्य खात्याकडे आहे. डॉक्टर, नर्स इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे चांगल्या सुविधांच वाणवा आहे. त्यामुळं रुग्णांवर योग्य उपचार करण्यात अडथळे आल्याचंही गार्डियनच्या एका वृत्तात म्हटलंय.

स्पेन पुन्हा चीनवरच अवलंबून
कोरोनाशी लढा देताना, अपुऱ्या आरोग्य सुविधा असलेला स्पेन पुन्हा चीनवरच अवलंबून आहे. चीनकडून अब्जावधी रुपयांचे आरोग्य साहित्य आणि औषधे स्पेन विकत घेत आहे. यामध्ये 55 लाख रॅपिड टेस्ट किट, 110 कोटी ग्लोव्ज, साडे पाच कोटी मास्क, अशा साहित्याचा समावेश आहे. स्पेनमध्ये सुविधा अपुऱ्या असून 47 हजार लागण झालेले पेशंट आहेत तर, जवळपास साडे चार लाख संशयित रुग्णांची संख्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus Condition Is Critical In Spain