Coronavirus : मेघालयात कोरोनाचा पहिला बळी; डॉक्टरचा मृत्यू

वृत्तसंस्था
Thursday, 16 April 2020

मेघालयातील एकमेव कोरोना रुग्ण असलेल्या डॉक्टरचा काल (ता. १५) सकाळी मृत्यू झाला. या डॉक्टरच्या कुटुंबातील त्याच्या पत्नीसह सहाजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी सांगितले आहे.

शिलाँग : मेघालयातील एकमेव कोरोना रुग्ण असलेल्या डॉक्टरचा काल (ता. १५) सकाळी मृत्यू झाला. या डॉक्टरच्या कुटुंबातील त्याच्या पत्नीसह सहाजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी सांगितले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेथनी हॉस्पिटल्सचे संस्थापक असलेले डॉ. जॉन एल. सैलो रायनथियांग (वय ६९) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांचे पहाटे २.४५ वाजता कोरोनाने त्यांचे निधन झाले. त्यांची चाचणी सोमवारी सायंकाळी सकारात्मक आली होती. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण आज पहाटे २.४५ वाजता मरण पावला असून संबंधित त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत, अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिलाँग येथे बेथनी हॉस्पिटल येथे रुग्ण असलेल्या डॉक्टरांना दाखल करण्यात आले होते. तो भाग व री भोई जिल्ह्य़ातील नोंगपाह गावातील याच रुग्णालयाचा दुसरा परिसर सील करण्यात आला असून तेथील सर्वाना वैद्यकीय आस्थापनांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शिलाँग येथील या रुग्णालयाच्या परिसरास २२ मार्चपासून दोन हजार जणांनी भेट दिली होती.

निम्मा पगार द्या, पण कंपन्या सुरु करा; बेरोजगारीची टांगती तलवार

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ६८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी सहा जणांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. या सहा जणांमध्ये सदर डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्य व मदतनीस यांचा समावेश आहे. आणखी सहा जणांची फेरचाचणी केली जाणार आहे. बाकी अनेकांच्या चाचण्या या नकारात्मक आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus First Victim dead In Meghalaya