esakal | Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus 1009 Confirmed Cases in India

भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी १००९ झाली. आतापर्यंत यापैकी २२ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे.

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : जगभरात कोरोणा व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतातही या विषाणूंचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशात भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी १००९ झाली. आतापर्यंत यापैकी २२ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे. भारतात आज (ता.२९) रविवारी सकाळपर्यंत करोनाच्या १००९ रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतापर्यंत एकूण ९०३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ८४ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. देशभरातील करोना बळींची संख्या आता २२ झाली आहे. केरळमध्ये एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला. हा रुग्ण एर्नाकुलमचा होता व त्याला २२ मार्च रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तो दुबईहून परत आल्यानंतर त्याला वेगळे ठेवण्यात आले होते. 

धक्कादायक ! कोरोनापासून बरे झालेल्यांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण

न्यूमोनियाची लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण नंतर त्याची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्याला हृदयरोग व उच्च रक्तदाबाचा विकारही होता. त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. स् कसरगोड येथे दहावीच्या परीक्षेस या महिन्यात उपस्थित राहिलेली मुलगी व तिच्या वडिलांना करोनाची लागण झाली आहे. तिचे वडील १७ मार्चला परदेशातून आले होते व त्यांची चाचणी सकारात्मक आली होती. केरळमधील रुग्णांची संख्या आता १८२ तर महाराष्ट्रात १८६ झाली आहे.

गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे. या महिलेचा सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात मृत्यू झाला. तिला अतिरक्तदाब व मधुमेह होता. गुजरातमध्ये कोरोनाचे सहा नवीन रुग्ण १२ तासांत सापडले असून एकूण रुग्णांची संख्या आता ५५ झाली आहे.

loading image
go to top