coronavirus: भारतात 24 तासांत 42 रुग्ण वाढले; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 मार्च 2020

भारतातील रुग्णांच्या संख्येने आज साडेसहाशेचा टप्पा ओलांडला. देशभरात 26 राज्यांमधल्या शंभराहून जास्त जिल्ह्यात आज संध्याकाळी पर्यंत 654 रुग्ण दाखल झाले.

नवी दिल्ली - चीनमध्ये जन्माला येऊन युरोप अमेरिका आणि आता सहज जगभरात मृत्यूचे तांडव मांडणाऱ्या कोरोनाच्या जागतिक साथीच्या  भारतातील रुग्णांच्या संख्येने आज साडेसहाशेचा टप्पा ओलांडला. देशभरात 26 राज्यांमधल्या शंभराहून जास्त जिल्ह्यात आज संध्याकाळी पर्यंत 654 रुग्ण दाखल झाले. यात 37 विदेशी रूग्ण आहेत. 34 जणांचा बळी गेला असून 43 जण आतापावेतो बरे झाले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात गतीने वाढणाऱ्या कोणाशी लढण्यासाठी भारताने 24 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा सामाजिक दुरावा - लॉकडाऊन घोषित केला आहे. आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासात 42 नवे कोरोना रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन नंतर कोरोना ग्रस्तांचा आकडा आणि त्याचा आलेख याचे प्रमाण आपले असले तरी केंद्राची यंत्रणा बेसावध किंवा गाफील नाही. लॉकडाऊनचे कटाक्षाने पालन करावे सांगून ते म्हणाले कॅबिनेट सचिवांनी आज सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून राज्यात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू देऊ नका असे निर्देश दिले आहेत.कोरोनाचे आव्हान प्रचंड आहे आणि एखाद्या व्यक्तीची चूकही फार महागात जाऊ शकते. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी पुन्हा केले. नॅशनल मेंटल हेल्थ संस्थेच्या वतीने देशभरातील आशा कर्मचाऱ्यांना माने डॉक्टरांना कोरोना बाबत जनजागृती साठी ऑनलाइन प्रशिक्षणाची योजना सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

दरम्यान कोविड - 19 च्या विषाणूंचा हल्ला परतावून लावण्यासाठी महाराष्ट्रासह 17 राज्यांनी वेगळी रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.  कोरोना ग्रस्तांच्या वाढत्या संख्येची करून रेल्वेने प्रवासी गाड्यांचे जे डबे वापरत नाहीत त्यांची तात्पुरती रुग्णालय बनवून उपचारांसाठी देण्याचा निर्णय केला आहे.

आणखी वाचा - मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीय का?

तांडा चालला... 
देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन नंतर महानगरांमध्ये रोजीरोटीच्या लढाईसाठी आलेल्या हजारो मजुरांची आणि कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. जवळ पैसे नाहीत आणि पोट भरायला अन नाही अशा अवस्थेत दिल्लीतील अनेक मजुरांचे तांडे राजधानी सोडून फरीदाबाद या मार्गाने सुनसान रस्त्यांवरून पायपीट करत आपल्या गावाकडे निघाले आहेत. 

कोरोना पहिली दहा राज्य ( एकूण रुग्ण मृत्यू आणि बरे झालेले या क्रमाने)
- - - - - - - - - - - - - - - - - -
महाराष्ट्र 125 - 4 - 3
केरळ    111   8  4
तेलंगण   43  1   10
कर्नाटक   41 0  3
दिल्ली   36  4  6
राजस्थान 36  2  3
गुजरात 42  1  - -
पंजाब 33 - -    - - 
उत्तर प्रदेश 42 - -  - -
हरियाना 18  4  11
जम्मू-काश्मीर - 26 1 - - -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus: 42 coronavirus patients in India increased by 24 hours