Coronavirus : देशात तब्बल 54 हजार लोकं...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 मार्च 2020

एकत्र घराबाहेर पडणे टाळा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे. रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विविध खबरदारी घेण्यात येत आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्र सरकारकडूनही महत्त्वाच्या सूचना केल्या जात आहे. तसेच आता तब्बल 54 हजार लोकांना सामूहिक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. याशिवाय राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्रातील तज्ज्ञ जगभरात कोरोनावर इलाज शोधणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत, असेही यावेळी ते म्हणाले. 

Coronavirus esakal

हर्षवर्धन म्हणाले, देशातील वैज्ञानिक जगभरातील संशोधकांच्या संपर्कात आहेत. व्हायरसवर अद्ययावत माहिती आयसीएमआर संस्थेतील वैज्ञानिक घेत आहेत. तसेच अमेरिकेत कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती आहे. मात्र, अशा प्रकारची लस योग्य त्या चाचण्या केल्याखेरीज रुग्णांना देता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

एकत्र घराबाहेर पडणे टाळा

देशभरात लोकांना एकत्र जमा होणे, घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus 54 Thousand Peoples are under Supervision