esakal | तबलिगी जमातसाठी विदेशातून आलेल्यांचं पुढं काय होतंय?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus another 350 foreigners blacklist who presented tablighi jamaat

बलिगी जमातमुळे 14 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढून होऊन ती 647 वर पोहोचली आहे तर काल 12 जणांचा मृत्यू झाला.

तबलिगी जमातसाठी विदेशातून आलेल्यांचं पुढं काय होतंय?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी परदेशातून दिल्लीत आलेल्या आणखी ३६० जणांना सरकारने काळ्या यादीत टाकले आहे. हे सर्वजण त्यांच्या मायदेशी पोहोचले आहेत तर काल 960 परदेशी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले होते. हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'या' देशांतून आले!
तबलिगी जमातमुळे 14 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढून होऊन ती 647 वर पोहोचली आहे तर काल 12 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात तबलिगी जमातच्या काही कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी परदेशी नागरिकांविरुद्धही कठोर कारवाई सुरू केली आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया, इंग्लंड, चीन, अमेरिका आदी देशांमधील नागरिकांचाही समावेश होता.

आणखी वाचा - कोरोनाचा विषाणू हवेतून पसरत नाही!

कालच 960 जणांविरुद्ध आपत्ती निवारण कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याच्या उल्लंघनाची कारवाई करताना त्यांचे व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. यासोबतच परदेशात रवाना झालेल्या 360 जणांनाही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सरकारने केला आहे. त्यांच्याविरुद्ध व्हिसा नियमाच्या उल्लंघनाच्या कारवाईसाठी संबंधित देशांनाही कळविण्यात येत आहे. भारतात असलेल्या 960 परदेशी नागरिकांना संबंधित देशांकडे हस्तांतरित करण्याचा अद्याप विचार नसून या सर्वांना विलगीकरण केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहे. 

आणखी वाचा - पिंपरीत निजामुद्दीन प्रकरणातला आणखी एक पॉझिटिव्ह

चिंता वाढली!
भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नव्यानं लागण झालेले जवळपास 65 टक्के रुग्ण हे तबलिगी जमात कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. दिल्लीत 384 रुग्ण नव्यानं आढळले आहेत. त्यातील 259 रुग्ण हे तबलिगी जमात कार्यक्रमाशी संबंधित आहेत. त्यामुळं भारतात चिंताजनक परिस्थिती उद्भवलेली आहे. मुळात भारतात जमातचा हा कार्यक्रम महाराष्ट्रात वसईमध्ये होणार होता. परंतु, राज्य सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर अखेर हा कार्यक्रम दिल्लीत घेण्यात आला. महाराष्ट्रात हा कार्यक्रम झाला असता. तर, कोरोनाचे आणखी रुग्ण महाराष्ट्रात आढळले असते. सध्या भारतात महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 

loading image
go to top