ओडिशात पर्यटनस्थळं पडली ओस; कोरोनाची 'नाकेबंदी' 

ब्रिजमोहन पाटील 
रविवार, 22 मार्च 2020

विलगीकरणासाठी 15 हजार परदेशात गेलेले ओडिशातील नागरिक कोरोनामुळे स्वगृही येत आहेत.

Coronavirus : चक्रीवादळात लाखो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या ओडिशा सरकारला "कोरोना'ची चाहूलही आधीच लागली. "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळण्यापूर्वीच देशांतर्गत स्थितीचा अंदाज घेत ओडिशा सरकारने विधिमंडळाचे अधिवेशन आटोपले, शाळा, महाविद्यालयांना टाळे लावले. जगन्नाथ पुरी, कोणार्क मंदिरासह पर्यटनस्थळे बंद केली, परदेशी पर्यटकांनाही राज्य सोडण्याच्या सूचना देत दिल्या. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना चार महिन्यांचे पैसे आगावू दिले देत कोरोनाला रोखण्याची तयार केली. विशेष म्हणजे भीती निर्माण न होता, अगदी सहजतेने तेथील नागरिकांनीही आपत्तीला थोपविण्याची मानसिकता तयार केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगन्नाथ मंदिर बंद
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील पत्रकारांचा ओडिशा अभ्यास दौरा आयोजित केला होता. नेमका हा दौरा सुरू झाल्यानंतर देशभरात "कोरोना'चा प्रभाव वाढत असताना नेहमीच आपत्तींना सामोरे जाणाऱ्या ओडिशा राज्याची तयारी अनुभवण्यास मिळाली. ओडिशामध्ये 16 मार्चला "कोरोना'चा पहिला रुग्ण आढळला. पण, तेथील सरकारने खबरदारी घेत 13 मार्चपासूनच राज्यात आपत्ती जाहीर केली होती. शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद केलीच; पण लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांवर बंधने आणली. हे निर्णय जाहीर होत असतानाच सरकार यापेक्षाही अधिक कडक निर्णय घेईल, याची मानसिक तयारीही स्थानिक व्यावसायिक व नागरिकांची झाली होती. दुसऱ्या टप्प्यात सरकारने पर्यटनावर नियंत्रण आणले. कोणार्कचे सूर्यमंदिर बंद केले. जगन्नाथ पुरीचे मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध आणले, गटागटाने आलेल्यांना मंदीरात येण्यास मज्जाव केला असल्याच्या बातम्या सोमवारी सायंकाळपर्यंत धडकायला सुरुवात झाली. गेले कित्तेक वर्ष ओडिसावर चक्रीवादळे धडकत आहेत, पण भाविकांसाठी मंदीर कधीच बंद नसते. वादळातही भाविक मंदिरात जगन्नाथाजवळ सुरक्षित असतात. पण, मंदीर भाविकांसाठी बंद केले आहे, अशी वेळ पहिल्यांदाच आल्याचे स्थानिक सांगत होते. 

आणखी वाचा - एसटीने कोठे जाण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी वाचा

पर्यटकांना मज्जाव
पुरी, कोणार्क येथील समुद्रकिनारे, रस्ते पर्यटकांअभावी ओस पडले. परदेशी पर्यटकांना राज्य सोडण्याच्या सूचना मिळाल्याने हॉटेल्स सोडावी लागली. यामुळे टूर ऑपरेटरना या पर्यटकांना दिल्ली, मुंबईत पाठवून देण्याची व्यवस्था करताना चांगलीच दमछाक झाली. 15 एप्रिल पर्यंत पर्यटकांना राज्यात मज्जाव केला आहे. हॉटेल चालकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीही बैठका घेतल्या जात आहेत. एकीकडे सरकार निर्बंध आणत असताना दुसरीकडे गावागावांतील नागरिक रस्त्यांवर थांबून पर्यटकांना मज्जाव करू लागले. "तुम्ही आत्ता येथून जा, कोरोना गेल्यानंतर पुन्हा या, आम्ही तुमचे स्वागत करू,' असे विनंतीवजा आदेश ग्रामस्थ पर्यटकांना देत होते. 

आणखी वाचा - मुंबईकरांचे भवितव्य त्या 402 प्रवाशांवर अवलंबून

चाकरमानी परतू लागले
विलगीकरणासाठी 15 हजार परदेशात गेलेले ओडिशातील नागरिक कोरोनामुळे स्वगृही येत आहेत. त्यांच्यापासून विषाणू पसरू नये, यासाठी सर्वांना "होम क्वारंटाइन' अनिवार्य केले आहे. पण, एवढ्यावरच न थांबता या नागरिकांना ऑनलाइन किंवा टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करायला लावली जाते. त्यानंतर 14 दिवसांच्या उपचार व इतर कारणांसाठी सरकारने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केलीच शिवाय त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज केले आहे. अत्तापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त नागिरकांनी नोंदणी केली आहे. 

आणखी वाचा - जनता कर्फ्युनंतर पीएम मोदी काय म्हणाले?

दृष्टीक्षेपात

  • कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायातीला पाच लाखाचा निधी 
  • ज्येष्ठ नागरिक, अपंग, विद्धांना चार महिन्यांचे आगावू पेंशन दिले 
  • राज्यातील बससेवा महिनाभर बंद करण्याची तांत्रीक समितीची शिफारस 
  • पर्यटकांची माहिती न देणाऱ्या भुवनेश्वचरमधील चार हॉटेल्सवर कारवाई
  • पर्यटकांसाठी 15 एप्रिलपर्यंत ओडिशा बंद 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus brijmohan patil writes blog about odisha tourism impact