तीन महिन्यांत काय घडलं? ज्यामुळं कच्च्या तेलाचे दर, गेले तळाला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

जागतिक अर्थव्यवस्था आधीच मंदावली असताना, कोरोनाच्या साथीमुळे जागतिक मागणीत कच्च्या तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.

Coronavirus : तेल आणि ऊर्जा व्यवसायासाठी २०२० चे पहिले तीन महिने अत्यंत वाईट राहिले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आधीच मंदावली असताना, कोरोनाच्या साथीमुळे जागतिक मागणीत कच्च्या तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. सौदी अरेबिया आणि रशिया त्यांच्या उत्पादनात कपातीचे नाव घेत नाहीयेत. त्यामुळे  किंमतीवर याचा दबाव वाढत आहे. हेच कारण आहे की कच्च्या तेलाची किंमत १८ वर्षांच्या सर्वात खालच्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बैठक रद्द 
ओपीसी(तेल उत्पादक देश) प्लस देशांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुमारे ४ % घट झाली. डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीत ६.५० टक्क्यांनी घट झाली आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांत आणखी बिकट होणार आहे जेव्हा जगातील तेल साठवण टाकी पूर्ण भरली जाईल आणि त्यानंतरही उत्पादन झाले तर तेल कंपन्यांनी ते कोठे ठेवले पाहिजे याचा विचार करावा लागेल.

१० डॉलरपर्यंत येतील दर
काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार जर ओपीसी(तेल उत्पादक देश)ची बैठक एका अनिश्चित काळासाठी टळली तर तेलाची किंमत १० डॉलर प्रति बॅरल होणे अपेक्षित आहे. या सर्व जागतिक घडामोडींमध्ये २१  व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवीन ह्युंदाई i20 लाँचिंग लांबणीवर, आता सप्टेंबरमध्ये होणार लाँच

तेल कंपन्याचे रेटिंग कमी
अमेरिकन तेल कंपन्या (डब्ल्यूटीआय उत्पादक) यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर  मूडीने AAA रेटिंग कमी करून AA-१ हे रेटिंग देऊन निगेटिव घोषित केले आहे, तर याआधी एस अँड पी कंपनीचे क्रेडीट कमी केले आहे. आता असा विश्वास आहे की अमेरिकेच्या ऊर्जा क्षेत्राला वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प क्रूडच्या आयातीवर कर लावू शकतात किंवा आयातीवर  पूर्णपणे बंदी घालू शकतात.

रशियाचा कट 
अमेरिका आणि रशियाच्या राजकारणाबद्दल सांगायचं झाले तर, रशिया आणि अमेरिका वेनेझुएलाच्या मुद्द्यांवरून एकमेकासमोर उभे आहेत. रशिया बऱ्याच काळापासून स्वतःसाठी संधी शोधत होता. असं म्हटलं जातंय की रशिया स्वत: साठी ही एक सुवर्णसंधी म्हणून कोरोना तावडीतील कमकुवत अमेरिकन अर्थव्यवस्था आणखी कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल. अमेरिकेतील सर्व तेल कंपन्या (डब्ल्यूटीआय उत्पादक) अयशस्वी झाल्यास त्याचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवर होणार आहे. या कंपन्यांवर बँकेचे प्रचंड कर्ज आहे आणि या कंपन्यांचे बुडण्यामुळे बँकिंग क्षेत्र कोलमडू शकते. त्यामुळं रशिया त्याची संधी शोधत असल्याचा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus crude oil prices lowest since 18 years information marathi

Tags
टॉपिकस
Topic Tags: