गुडन्यूज : देशातल्या या मोठ्या शहरात लॉकडाऊन होणार शिथील 

वृत्तसंस्था
Monday, 27 April 2020

केंद्रसरकारच्या सूचनांनुसार मॉल,मद्यविक्रीच्या दुकानांना येथेही बंदी असणार असून कंटेनमेंटझोनमधील जीवनावश्यकवस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकानांना बंद ठेवण्यात येणारअसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले

नवी दिल्ली Coronavirus : केंद्राच्या सूचनांनुसार ३ मे पर्यंत दिल्लीतील लॉकडाउन शिथिल केले जाणार नसल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी रविवारी दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या सूचनांनुसार जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार मॉल, मद्यविक्रीच्या दुकानांना येथेही बंदी असणार असून कंटेनमेंट झोनमधील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकानांना बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजस्थानात ५८ नवीन रुग्ण 
जयपूर: राजस्थानमध्ये गेल्या चोवीस तासात ५८ आणखी नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे राजस्थानातील बाधितांची संख्या २१४१ वर पोचली आहे. नवीन रुग्णात अजमेर येथे ११, हनुमानगड, झालवार येथे प्रत्येकी एक, जोधपूर येथे १५, जयपूर येथे सात, कोटा येथे ३ आणि नागोर येथे वीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. राज्यातील २१४१ रुग्णांपैकी ५१३ जण बरे झाले असून २४४ जणांना घरी सोपहले आहेत. तसेच आतापर्यंत ३५ जण मृत्युमुखी पडले आहेत. 

स्टेम सेल थेरेपीचाही पर्याय;८३ टक्के रुग्णांवर यशस्वी प्रयोग झाल्याचा दावा 

पॉझिटिव्हचे प्रमाण १.६६ टक्के 
विजयवाडा (आंध्रप्रदेश): कोरोना संसंगामुळे आंध्र प्रदेशात आतापर्यंत ६१,२६६ जणांची चाचणी घेतली असून त्यापैकी १.६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे. राज्याचे आरोग्य सचिव के.एस.जवाहर रेड्डी म्हणाले, की राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.६६ टक्के इतके आहे. या तुलनेत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले आहे. संशयितांच्या मदतीसाठी १०४ क्रमांकाची हेल्पलाइन असून नमुने गोळा करण्यासाठी डोअर टू डोअर सेवा उपलब्ध करुन दिल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण घटल्याचेही ते म्हणाले. याशिवाय आरोग्य सेवेत नव्याने ११७० जणांना नव्याने सामावून घेतले असून त्यांना राज्यातील विविध जिल्ह्यात रवाना केले आहे. 

ओडिशात तीन रुग्ण पॉझिटिव्ह 
भुवनेश्‍वर: ओडिशात आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १०३ वर पोचली आहे. यापैकी ६८ जण सक्रिय असल्याचे म्हटले आहे. ३४ जण बरे झाले असून आतापर्यत एक जण मृत्युमुखी पडले आहेत. भुवनेश्‍वरसह अन्य शहरात ड्रोन आणि रोबोच्या मदतीने सॅनेटायजेशनची मोहिम राबविली जात आहे. लॉकडाउनचे पालन काटेकोरपणे होत असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

कोरोनामुळे एकट्या अमेरिकेत ५० हजारांहून अधिक मृत्यू, युरोपातही थैमान सुरूच 

झारखंडमध्ये बरे होण्याचे प्रमाण १८ टक्के 
रांची (झारखंड): झारखंडमध्ये चालू आठवड्यात रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण १८ टक्के आहे. आतापर्यंत १३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचे राज्य आरोग्य खात्याने सांगितले. त्यापैकी रांची येथील सहा, बोकारो येथे चार, हजारीबाग येथे दोन आणि शिमडेगा येथील एकाचा समावेश आहे. यादरम्यान, २५ एप्रिलपर्यंत ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ५१ सक्रिय असून दोघांचा मृत्यु झाला आहे. 

विजयनगरम ‘ग्रीन झोन’मध्ये 
विजयनगरम (आंध्र प्रदेश): विजयनगरम प्रशासनाने व्हीटी आग्राहरम भागात मोबाइल टेस्टिंग प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकाची तातडीने चाचणी करणे हा या प्रयोगशाळेमागचा हेतू आहे. विजयनगरम हा ग्रीन झोनमध्ये असून तो कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चाचणी करणे गरजेचे आहे. यानुसार पोलिसांनी २५ स्थलांतरित मजुरांची तपासणी केली. या चाचणीनंतर काही जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय विजयवाडाहून येणाऱ्या अधिकारी गटांची चाचणी देखील करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus delhi government will reduce lockdown restrictions