Coronavirus : रेल्वे अन् विमानसेवेचा प्रवासी वाहतुकीसंदर्भात मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

रेल्वे आणि विमानसेवेने प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशामध्ये रेल्वे आणि विमानसेवा बंद राहणार आहे. सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेण्यात आला असल्याचे सांगितले. मोदींनी संवाद साधताना १४ एप्रिल नंतर लॉकडाउनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर रेल्वे आणि विमानसेवेने प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशामध्ये रेल्वे आणि विमानसेवा बंद राहणार आहे. सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रीमियम ट्रेन, मेल/एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे या सर्व रेल्वे सेवांची स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयापूर्वी भारतीय रेल्वे प्रशासनाने ३ लाख ३८ हजार लोकांनी रेल्वे तिकीट रद्द केले आहे. १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपेल या आशेने २१ लाख १७ हजार प्रवाशांनी रेल्वे तिकिटासाठी आरक्षण केले होते. हे लोक १५ ते ३० एप्रिल दरम्यान रेल्वे प्रवास करणार होते. मात्र, लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर सर्व तिकीटे काल (दि. १३) रद्द करण्यात आली. 

मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्या मात्र सुरु राहणार आहेत. २१ दिवसांच्या लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणे अपेक्षित होते. त्यामुळेच १५ एप्रिलपासून रेल्वेचे तिकीट उपलब्ध होत असल्याने १४ तारखेनंतर रेल्वे सेवा सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आज मोदींनी लॉकडाउनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवल्यानंतर रेल्वेनेही पुढील १९ दिवस प्रवासी वाहतूक सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यात अद्यापही यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत, असं नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे. मात्र आठवडाभर म्हणजेच २० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार असून काही भागांमध्ये जेथे कोरोनाचा प्रदुर्भाव झालेले नाही अशा भांगामधील निर्बंध उठवण्यासंदर्भातील संकेतही मोदींनी दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus : Flight train services suspended till May 3