कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसाठी मोठा निर्णय; वाचा देशात कोठे किती रुग्ण?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबईसह महाराष्ट्रातील चार मोठी शहर बंद करण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

नवी दिल्ली Coronavirus :  चीन आणि युरोपमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतात शिरकाव झाला आहे. भारतातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, सरकारने महानगरांबाबत मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. मुंबईसह महाराष्ट्रातील चार मोठी शहर बंद करण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. तर, दिल्लीतही येत्या 31 मार्च पर्यंत शहरातील सर्व शॉपिंग मॉल, बंद करण्यात येणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

आता बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देशात कोठे किती बळी?
भारतात आतापर्यंत 195 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, त्यातील 32 जण विदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. सध्या देशातील 20 राज्यांमध्ये कोरोनाच संसर्ग झाला आहे. देशातील सर्व प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक 44 कोरोनारुग्ण आहेत. एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यामुळं थोडं चिंतेचं वातावरण असलं तरी, परिस्थिती आटोक्यात असल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे.

आणखी वाचा - शाब्बास महाराष्ट्र, पाच कोरोना पॉझिटिव्ह झाले निगेटिव्ह

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
राज्य रुग्णांची संख्या  उपचारांनंतर बरे झालेले मृतांची संख्या
आंध्र प्रदेश 2 0 0
छत्तीसगड  1 0 0
दिल्ली  16  3 1
गुजरात  2 0 0
हरियाणा 3 0 0
कर्नाटक  15  0 1
केरळ  26 3 0
महाराष्ट्र  44 0 1
ओडिशा 1 0 0
पाँडेचरी  1 0 0
पंजाब 2 0 1
राजस्थान  5 3 0
तामीळनाडू  3 1 0
तेलंगणा  7 1 0

चंदिगड

1 0 0
जम्मू-काश्मीर 4 0 0
लडाख 10 0 0
उत्तर प्रदेश  18 9 0
उत्तराखंड 1 0 0
पश्चिम बंगाल  1 0 0

राजधानी दिल्लीही बंद 
महाराष्ट्रात मुंबई उपगनरसह, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर ही वर्दळीची शहरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या शहरांमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता बाकी सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिल्लीतही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये म्हणून, आवश्यक पावले उचलण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी येत्या 31 मार्चपर्यंत थिएटर, मॉल्स बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. दिल्लीत किराणा दुकानं, मेडिकल शॉप्स आणि भाजीची दुकानं फक्त सुरू राहणार आहेत. दूध वितरणही नियमित सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india count four deaths maharashtra maximum number affected patients