पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; 21 दिवसांसाठी देश 'लॉक डाऊन'

टीम ई-सकाळ
मंगळवार, 24 मार्च 2020

एक लाख लोकांपर्यंत लागण होण्यासाठी 67 दिवस लागले त्यानंतर दोन लाखांना लागण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले. दोन लाखांपासून 3 लाख लोकांपर्यंत याचा संसर्ग होण्यासाठी केवळ चार दिवस लागले.

नवी दिल्ली Coronavirus:देशात आज रात्री बारा वाजल्यापासून 21 दिवसांसाठी देश लॉक डाऊन करत असल्याची सर्वांत मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कोरोना व्हायरसची संक्रमण सायकल तोडण्यासाठी 21 दिवसांची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. त्यामुळं आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन होणार आहे. कोरोनाशी लढण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद यातून टेस्टिंग लॅब, मेडिकल, पॅरा मेडिकल सुविधांसाठी यातून कामं केलं जाईल. राज्य सरकारांना आरोग्य सुविधा देण्यालाच प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्याचं पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'कोरोना म्हणजे, कोई....रोडपर....ना निकले. कोरोना झालेल्या व्यक्तीला त्याची लागण झाल्याचं स्पष्ट दिसत नाही. ते कळण्यासाठी वेळ लागतो. त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची लागण होते. एक लाख लोकांपर्यंत लागण होण्यासाठी 67 दिवस लागले त्यानंतर दोन लाखांना लागण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले. दोन लाखांपासून 3 लाख लोकांपर्यंत याचा संसर्ग होण्यासाठी केवळ चार दिवस लागले. त्यामुळं कोरोना किती वेगानं पसरतो हे तुमच्या लक्षात आलंय असेल, त्यामुळं हा रोग रोखणं, अवघड आहे. अनेक देशांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली. इटली, अमेरिका या देशांमध्ये आरोग्य सेवा संपूर्ण जगात सर्वोत्तम आहे. तरीही त्यांना कोरोनाला रोखता आलं नाही.' 

कोरोनाशी संबंधित सर्व घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

  • कोरोनाची जभरातील परिस्थिती तुमच्या समोर आहे
  • जगातील बड्या बड्या देशांपुढं कोरोनानं आव्हान उभं केलंय 
  • कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा एकमेव पर्याय 
  • सोशल डिस्टंसिंग पंतप्रधानांसह सगळ्यांसाठी गरजेचं 
  • आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात; पूर्णपणे लॉक डाऊन 
  • जनता कर्फ्युपेक्षा कडक, जनता कर्फ्युपेक्षा लॉक डाऊन मोठा असणार
  • कोणत्याही पद्धतीची अफवा आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका 
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india lockdown for 21 days pm narendra modi speech