Coronavirus : कोरोनामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
Sunday, 19 April 2020

कोरोनामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू लुधियाना : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पंजबामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील लुधियाना शहरात सहायक पोलिस आयुक्त पदावर काम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Coronavirus : कोरोनामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू लुधियाना : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पंजबामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील लुधियाना शहरात सहायक पोलिस आयुक्त पदावर काम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

१३ एप्रिल रोजी या पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना शहरातील एसपीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे पंजाबमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता १६ वर पोहचला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करुन दिली आहे.

देशभरात करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर हा पोलिस अधिकारी दररोज ९ ते १० तास कामावर कार्यरत होता. पंजाबमध्ये संचारबंदी लागू झाल्यानंतर भाजी मार्केट परिसरात अधिकारी गस्तीवर असायचे. ८ एप्रिल रोजी अधिकाऱ्याला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं, ज्यावेळी त्यांची कोरोनाची चाचणी झाली. १३ तारखेला या चाचणीचा अहवाल आला ज्यात अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र या अधिकाऱ्याला नेमक्या कोणत्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली हे समजलेले नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारपासून पोलिस अधिकाऱ्याची तब्येत ढासळू लागली. यानंतर शरीरातले अनेक महत्वाचे अवयव काम करायचं बंद झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त लुधिनाया पोलिसांत काम करत असलेल्या आणखी एका सहायक पोलिस निरीक्षकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आतापर्यंत लुधियानात ४ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus in India: Ludhiana ACP dies of Covid-19