देशात असे वाढत गेले कोरोना रुग्ण; माहिती एका क्लिकवर!

टीम ई-सकाळ
Thursday, 9 April 2020

एप्रिल महिन्यामध्ये रुग्णांच्या संख्येत दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे.

Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरस या आजाराने माहामारीची स्वरुप घेतले आहे, आजवर जगभरात 87 हजार लोकांनी त्यांचा जीव या आजारामुळे गमावला आहे. तर जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवासात कोरोना रुग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये देखील मृतांचा आकाडा 186 वर पोहचला असून, देशात कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या ही 6 हजारांच्या वर गेली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतामध्ये एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. मार्च महिन्यात दिवसाला 20-50 रुग्ण सापडत होते. पण, त्यांची संख्या एप्रिल महिन्यामध्ये रुग्णांच्या संख्येत दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे.
 भारतात 1 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या ही 1 हजार 834 होती. तर त्या आकड्यांमध्ये दुसऱ्या दिवशी 200 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. तसेच 4 एप्रिल रोजी भारतात पहिल्यांदा एका दिवसामध्ये 500 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसात भारतातील वेगवेगळ्या ठिकाणीहून रोज 500 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत रुग्णाचा आकाडा नोंदवला जात आहे. रुग्णांचा वाढता आकडा 7 एप्रिल या दिवशी 4 हजार789 वर पोहचला.

आणखी वाचा - बारामती राबवला जाणारा भिलवाडा पॅटर्न आहे तरी काय?

जगभरात तर कोरोना रुग्णांची संख्या भयानक आहे, जगात 15 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या 192 देशांमध्ये 87 हजार 320 लोक कोरोनामुळे दगावले आहेत. अमेरिकेत आजवर दगावलेल्या लोकांची संख्या 14 हजार 817 एवढी असून 4 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. स्पेन मध्ये 14 हजार 555 लोक दगावले आहेत तर इटलीमध्ये तो आकडा 17 हजार 669 वर पोहचला आहे. जगभरात कोरोनाचा सगळ्यात जास्त प्रभाव युरोपवर झाला आहे, युऱोपात 7 लाख 72 हजार 592 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी 61 हजार 118 लोक दगावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india updates from 1st march information marathi