मोठी बातमी : उद्योजक, व्यवसायिकांसाठी मोदींकडून मोठी घोषणा शक्य!

टीम ई-सकाळ
Monday, 13 April 2020

कोरोनाव्हायरसचा लॉकडाउन असताना योग्य सुरक्षा उपायांसह औद्योगिक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली जावी अशा आशयाचे पत्र वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गृहमंत्रालयाला पाठवले आहे.

Coronavirus : लॉकडाऊनमुळे औद्योगिक व्यवसाय ठप्प पडण्याची भीती व्यवसायीकांनी वाणिज्य मंत्रालयाकडून अनेक राज्यातील व्यवसायिक संघटनेशी घेतलेल्या चर्चासत्रात बोलून दाखवली आहे. यामुळेच उद्योग मंत्रालयाकडून व्यवस्थित सुरक्षेसह व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. उद्या 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यात या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळे संपूर्ण देशातील उद्योग पूर्णपणे बंद झालेले आहेत. याचा खूप मोठा फटका आर्थिक दृष्ट्या देशाला बसत असून यामुळे औद्योगिक व्यवसाय ठप्प पडण्याची भीती व्यवसायीकांनी वाणिज्य मंत्रालयाकडून अनेक राज्यातील व्यवसायिक संघटनेशी घेतलेल्या चर्चासत्रात बोलून दाखवली आहे. आता यामुळेच उद्योग मंत्रालयाकडून व्यवस्थित सुरक्षेसह व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

आणखी वाचा - वाचा शिस्तप्रिय जपानच्या लॉकडाऊन विषयी!

कोरोनाव्हायरसचा लॉकडाउन असताना योग्य सुरक्षा उपायांसह औद्योगिक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली जावी अशा आशयाचे पत्र वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गृहमंत्रालयाला पाठवले आहे. मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे की वाहने, वस्त्रोद्योग, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य क्षेत्रात आंशिक उत्पादन करण्यास परवानगी देण्यात यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, आता त्याची मुदत वाढवून ३० एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे. अशी अपेक्षा आहे की पंतप्रधान मोदी  आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी काही क्षेत्रांना लॉकडाऊन काळात काही सवलत देऊन ते व्यवसाय आंशिक प्रमाणात सुरु करण्याची परवानगी देऊ शकतात. वाणिज्य सचिव गुरुप्रसाद महापात्रा यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे की, असे वाटते की लॉकडाऊनच्या अंतिम निर्णयानंतर काही विशिष्ट कामांना (योग्य ते काम) परवानगी देण्यात यावी. आर्थिक हालचाली सुधारण्यासाठी हे आवश्यक आहे आणि यामुळे सर्वसामान्यांच्या हाती पैसा येईल. मला खात्री आहे की शेतीसारखी अन्य मंत्रालये महत्त्वपूर्ण कामांसाठी गृह मंत्रालयाशी संपर्क साधतील.

भन्नाट व्हिडिओ : ही शिक्षा पाहून तुम्हाला तुमची शाळा आठवेल!

कोणी केली मागणी?
वाणिज्य मंत्रालयाने विविध राज्ये आणि उद्योग संघटनांशी संवाद साधून सूचना केल्या आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की वस्त्रोद्योग आणि वाहनांसारख्या मोठ्या उद्योगांना एकाच शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, निर्यात करणाऱ्या लहान आणि मध्यम युनिट्स (एमएसएमई) देखील कमीतकमी मनुष्यबळासह ऑपरेट करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. वाणिज्य मंत्रालयाने असे सुचविले आहे की दूरसंचार उपकरणे, स्टील, सिमेंट, कागद, शीतपेये आणि खाद्यपदार्थांच्या उत्पादनांशी संबंधित उद्योगांनाही किमान कर्मचार्यां सोबत व सुरक्षा उपाय घेऊन पुन्हा सुरू केले पाहिजे. गृहनिर्माण आणि बांधकाम, पथ विक्रेते, घरगुती उपकरणे आणि मोबाइल फोन दुरुस्तीस देखील परवानगी दिली जावी असे वाणिज्य मंत्रालयाकडून सुचवण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus industrial activities will start with safety pm narendra modi may announce