हे नक्की वाचा : आठवड्यात करोनोला हरवलं आणि पुन्हा रुग्णसेवेसाठी तयार!

टीम ई-सकाळ
Monday, 6 April 2020

रणरागिणीचे नाव आहे रेश्मा मोहनदास. रेश्मा 32 वर्षांची आहे. 93 वर्षीय थॉमस अब्राहम यांची शुश्रुषा तिनेच केली.

कोट्टायम Coronavirus : नव्वदी पार केलेल्या रुग्णाला कोरोनावर मात करण्यात बहुमोल भूमिका बजावलेल्या केरळमधील परिचारिकेला या विषाणूंचा संसर्ग झाला, पण एका आठवड्यात तुला हरवेन आणि मगच अतिदक्षता विभागातील या खोलीतून सहीसलामत बाहेर पडेन, अशी प्रतिज्ञा करीत तिने विलक्षण मनोधैर्याच्या जोरावर आपले शब्द खरे ठरविले. आता ती पुन्हा एकदा कर्तव्य बजावण्यासाठी उत्सुक आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - तुम्ही सुरक्षित आहात का? सरकारचे ऍप सांगणार माहिती

या रणरागिणीचे नाव आहे रेश्मा मोहनदास. रेश्मा 32 वर्षांची आहे. 93 वर्षीय थॉमस अब्राहम यांची शुश्रुषा तिनेच केली. त्यांचे बरे होणे हा वैद्यकीय चमत्कार ठरला. थॉमस यांना 88 वर्षांची सहचारिणी मरीयम्मा हिच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर रेश्माला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे तिला रुग्णालयातील अतीदक्षता विभागात विलगीकरणाचे उपचार करून घ्यावे लागले. तेथील रुममध्ये प्रवेश केल्यानंतर तिने सहकारी परिचारीकांच्या व्हॉटस ऍप ग्रुपमध्ये हा संदेश पोस्ट केला होता. केरळमधधील आरोग्य यंत्रणा जागतिक दर्जाची असून त्यावर आपला गाढ विश्वास असल्याचे तिने नमूद केले होते. 

आणखी वाचा - मुंबईत दहा लाख तबलिगींविरोधात गुन्हा दाखल

आता रेश्माआला डिस्चार्ज मिळाला असून तिचे घरी 14 दिवसांसाठी क्वारंटाइन सुरु आहे. तेथून तिने वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला सांगितले की, मी अजिबात दडपणाखाली नव्हते. मला वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यायला आवडते. आम्ही आयसीयूमध्ये बऱ्याच गप्पा मारायचो. मी त्यांच्या खुप जवळ असायचे. त्यांना मास्क लावायला आवडायचे नाही, कारण त्यामुळे त्यांना त्रास व्हायचा. परिणामी मला कोरोना झाला असावा. केरळचे आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी रेश्मााशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि ती बरी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. रेश्माने तिच्या व्यावसायिक कर्तव्याबाबत दाखविलेली निष्ठा कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus kerala nurse wants join hospital after negative covid19 test