Coronavirus : एलआयसीकडूनही हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत आरबीयने हफ्ते तीन महिने स्थगित करण्याच्या सूचना दिल्यानंतर जवळपास सर्व बँकानी तीन महिन्यासाठी हफ्ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीत आरबीयने हफ्ते तीन महिने स्थगित करण्याच्या सूचना दिल्यानंतर जवळपास सर्व बँकानी तीन महिन्यासाठी हफ्ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विम्याचे हप्ते फेब्रुवारीत देय असलेल्यांसाठीचा वाढीव मुदतीचा काळ २२ मार्चनंतर संपुष्टात येत होता. त्यांना १५ एप्रिलपर्यंत हप्ते भरता येतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. ज्या विमाधारकांच्या विम्याला आरोग्य तपासणीशिवाय फेरमुदत देता येणे शक्य आहे, त्या प्रकरणांत ऑनलाइन कार्यवाही केली जाईल. विम्याचे हप्ते भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. आवश्यक माहिती संकेतस्थळावर दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल, असे एलआयसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Coronavirus : अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; बळींचा उच्चांक

महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे विमाधारकाचा मृत्यू ओढवल्यास अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे काल (ता. ११) शनिवारी जाहीर करण्यात आले. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत १६ विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आली असल्याचेही महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus LIC extends premium payment deadline