Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४०००च्या वर; तर मृत्यूची संख्या...

वृत्तसंस्था
Monday, 6 April 2020

जगभरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ४२८८ वर पोहोचली आहे तर एकूण ११७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. मृत्यूंचा आकडा शंभरीपार झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ४२८८ वर पोहोचली आहे तर एकूण ११७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. मृत्यूंचा आकडा शंभरीपार झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध राज्यांमधील वृत्तानुसार देशात आतापर्यंत करोनामुळे ११७ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या ४२८८ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३२८ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

तबलिगी जमातने पाकिस्तानची उडविली झोप; ४१ हजार जणांना शोधण्याचे लक्ष

दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ६९ हजार ४५६ जणांचा बळी घेतला आहे. तर १२ लाख ७३ हजार ४८६ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात ०२ लाख ६२ हजार ४८६ जण कोरानामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे.

राज्यात कोरोनासाठी 30 विशेष रुग्णालये; कोणतं रुग्णालय तुमच्या जवळ?

तत्पूर्वी, देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन माजी राष्ट्रपती, दोन माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. देशातील करोनासंदर्भातील परिस्थितीची माहिती मोदींनी त्यांना दिली. पंतप्रधानांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus LIVE: India cases at 4288 death toll 117