एका आईने पंतप्रधान मोदींना दिली हाक; राजस्थानवरून उंटाचे दूध पोहोचले मुंबईत

टीम ई-सकाळ
Tuesday, 14 April 2020

तिच्या मुलाला गाय, म्हशी आणि बकरीच्या दुधापासून एलर्जी आहे आणि यासाठीच तिला फक्त उंटाच्या दुधाची गरज आहे.

मुंबई : मुंबईतील एका महिलेच्या ३.५ वर्षाच्या मुलाला ऑटीझम नावाचा आजार असल्याने त्याला खाद्य पदार्थांची एलर्जी आहे. त्याच्या आईने ट्विट करत चक्क पंतप्रधान मोदींना याबाबत माहिती दिली व राजस्थानवरून उंटाचे दूध मिळावे यासाठी मदत मागितली. त्या लहान बाळापर्यंत आता हे उंटाचे दूध पोहोचवण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांपूर्वी एका आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले होते की, साडेतीन वर्षाच्या मुलाला लॉकडाऊनमुळे उंटांचे दूध कोठूनही मिळू शकत नाहीये. या महिलेने आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, तिच्या मुलाला गाय, म्हशी आणि बकरीच्या दुधापासून एलर्जी आहे आणि यासाठीच तिला फक्त उंटाच्या दुधाची गरज आहे. यानंतर, रेल्वेने मुंबईतील या महिलेपर्यंत २० लिटर उंटांचे दूध पोहोचवण्यात आले आहे.
शनिवारी आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती आणि तेव्हापासून आयपीएस अधिकाऱ्यांचे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “२० लिटर उंटाचे दूध रात्रीच्या वेळी रेल्वेमार्गे मुंबईत आणण्यात आले आहे. यानंतर, या कुटुंबाने ज्या इतर कुटुंबाना या दुधाची गरज आहे त्यांना सुद्धा हे दूध दिले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुलाची आई रेणु कुमारी यांनी पीएम मोदी यांना टॅग करताना या संदर्भात ट्विट केले होते, ज्यात तिने आपल्या मुलाच्या स्थितीविषयी सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सर मी ऑटिझम असलेल्या साडेतीन वर्षाच्या मुलाची आई आहे आणि बऱ्याच अन्न पदार्थांची माझ्या मुलाला एलर्जी आहे. तो उंटाचे दूध आणि फक्त काही डाळी खाऊ शकतो. लॉकडाउन झाल्यानंतर माझ्याकडे जास्त उंटाचे दूध नव्हते. मला राजस्थानातील साद्री येथून उंटाचे दूध आणि तिची पावडर मिळविण्यासाठी मदत करा.' या आशयाचे ट्विट रेणू कुमारी यांनी केले होते. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यानंतर देशभरातील लोकांनी यावर आपल्या सूचना दिल्या होत्या. यात आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांचाही समावेश आहे. राजस्थानात उंटाच्या दुधावर आधारित उत्पादने विकणार्याा अदविक फूड्सशीही त्यांनी संपर्क साधला. यानंतर कंपनीने उंटाच्या दुधाची पावडर दिली पण ती मुंबईत पोहोचण्यात अडचण होती. याबाबत बोलताना उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक तरुण जैन म्हणाले की, अरुण बोथरा यांच्या ट्विटनंतर आम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर मी त्याविषयी अजमेरचे वरिष्ठ डीसीएम महेश चंद जावालिया यांच्याशी बोललो. आम्ही मुंबईला प्रवास करणारी लुधियाना ते वांद्रे मालवाहू गाडी ००९०२ ला राजस्थानातील फालना स्टेशनवर थांबवून तेथून मुंबईला हे उंटाचे दूध पाठविले. याबाबतची सूचना मुख्य वाणिज्य निरीक्षक अखिल तनेजा यांना देण्यात आली. आणि फालना स्टेशनवरून ते उंटाचे दूध त्या मातेपर्यंत पोहचविण्यात आले आहे. त्या मातेने सुद्धा ज्या कुटुंबाना त्या दुधाची गरज होती त्यांना ते दूध दिले आहे. आता या घटनेचे सर्वत्र कोतूक केले जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown mumbai woman twitter pm modi for camel milk