Coronavirus : देशात आहेत कोरोनाचे 35 हटस्पॉटस्; जाणून घ्या ठिकाणे

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 April 2020

राज्यसभेच्या इतिहासात प्रथमच...!
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे जे ५५ सदस्य आज निवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवडणूक अद्याप न झाल्याने निवडणुका होणाऱ्या १७ जागा संसर्ग आहेत. कोरोनाचा  संपल्यानंतर या निवडणुका घेण्यात येतील, असे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी जारी जाहीर केले आहे. राज्यसभेमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागेच्या निवडणुका या त्याच्या अगोदरच पार पडतात. पण संसदेच्या इतिहासात १७ जागा रिक्त राहण्याचा प्रसंग हा पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. या १७ जागांमध्ये गुजरात व आंध्र प्रदेशातील प्रत्येकी चार राजस्थान व मध्य प्रदेशातील प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन आणि मणिपूरमधील एक जागाचा समावेश आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, संस्कृतिक राजधानी वाराणसी व पुणे आणि सर्वात स्वच्छ शहराचा मान सातत्याने मिळवणाऱ्या इंदोरसह देशाच्या आठ राज्यांमधील किमान ३५ ठिकाणं कोरोना महासाथीचा हॉटस्पॉट बनली आहेत.  परिणामी या शहरांमधील एका मागोमाग एक भाग हे पूर्णतः सील करण्याचे धोरण यंत्रणेला अमलात आणावे लागत आहे. सील कराव्या लागणाऱ्या भागांमध्ये वाढ होणार नाही, याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रासह तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगण,  आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या आठ राज्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव आहे. चार दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट वाढली आहे. त्यामुळेच अनेक शहरांमध्ये अतिसंवेदनशील म्हणजेच हॉटस्पॉट निश्चित करून ते सील करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढूनही गेल्या दोन दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्याही दुपटीने वाढली आहे. राजधानी दिल्लीत २० भाग नव्याने सील करण्यात आले. यामध्ये मंडी हाऊस परिसरातील बंगाली मार्केट, दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर, द्वारका, पांडवनगर यासारखे उच्च तसेच मध्यमवर्गीयांची वस्ती असलेले भागही आहेत.

No photo description available.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील विविध रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच सरकारी व खासगी रुग्णालयांमधील  सुविधा, मास्कसह इतर उपकरणांची उपलब्धता इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा केली. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि मुख्य सचिव विजय देव हे उपस्थित होते. दिल्ली तीन एप्रिलला १४१ वर असलेली रुग्णसंख्या आज ६७० वर गेली.  गेल्या एक दिवसात वाढलेल्या ९३ रुग्णांमध्ये सर्वच्या सर्व निजामुद्दीन भागातील तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आढळले आहेत. एकूण ६७० रुग्णांपैकी  ४२६ लोक येथूनच बाहेर पडल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे.

हॉटस्पॉट म्हणजे काय?
कोरोना महासाथीचा विळखा घट्ट होण्याच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भागांना हॉटस्पॉट असे म्हणण्यात येते . एकाच गल्लीत अपार्टमेंटमध्ये किंवा भागात सहापेक्षा जास्त करोनाग्रस्त आढळले तर ते ठिकाण हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात येते. त्याठिकाणी मेडिकल आणि जीवनावश्यक वस्तूंसह कोणतेही दुकान उघडत नाही. त्याचप्रमाणे नागरिकांना घराबाहेर पडू दिले जात नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus major 35 hotspots india information in marathi