esakal | ऑनलाईन शॉपिंग संदर्भात महत्त्वाची बातमी; 'या' वस्तूच मागवता येणार
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus online shopping only for essential commodities

लॉकडानउमुळे देशभरातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहे. अशात सरकारने ऑनलाईन शॉपिंग संदर्भात सुधारित आदेश काढलाय.

ऑनलाईन शॉपिंग संदर्भात महत्त्वाची बातमी; 'या' वस्तूच मागवता येणार

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली Coronavirus : लॉकडाउनच्या काळात ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंचे वितरण करता येणार नाही. या कंपन्यांनी आवश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करू नये, असे आदेश गृहमंत्रालयाने बजावले आहे. थोडक्यात लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स वेबसाईटवरून तुम्हाला चैनीच्या वस्तू मागवता येणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलंय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जीवनावश्यक वस्तूंचीच ऑनलाइन विक्री
लॉकडानउमुळे देशभरातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहे. अशात सरकारने सुधारित आदेश काढताना मोबाईल, टीव्ही, फ्रिज यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणेच अन्य अनावश्यक वस्तूंच्या ऑनलाईन वितरणावर निर्बंध घातले आहे. गृहसचिव अजय भल्ला यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार ई कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या वाहनांचा वापर केवळ अत्यावश्यक साहित्याच्या वितरणासाठीच करावा लागेल. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल, असे सरकातर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार लॉकडाउनमध्ये अन्नधान्य, भाजीपाला, औषधविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. तर जीवनावश्यक वस्तुंची घरपोच विक्री देखील सुरू आहे. २५ मार्चला लॉकडाउन लागू झाल्यानंतर देशातील ई-कॉमर्स कंपन्यातर्फे केवळ जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाइन विक्री करत आहेत. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इलेक्ट्रॉनिक वस्तू्ंवर निर्बंध
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनंतर ३ मेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केली. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनसाठी जाहीर झालेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना मोबाईल फोन, टिव्ही, फ्रिज, लॅपटॉप, स्टेशनरी यासारख्या वस्तुंच्या विक्रीसाठी २० एप्रिलपासून सवलत मिळेल, असे त्यात म्हटले होते. आता मात्र लॉकडाऊनच्या काळात वितरण करण्यावर निर्बंध घातले आहेत. लॉकडाउनदरम्यान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमाने, रेल्वेगाड्या, शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, क्रीडा केंद्रे, तरण तलाव, धार्मिक स्थळ व कार्यक्रम यावर सरकारने बंदी घातली असून अंत्ययात्रेमध्येही २० पेक्षा अधिक जणांना सहभागास बंदी घातली आहे. केवळ कृषी आणि पूरक उद्योग, बाजार समित्या, मनरेगाची कामे, ग्रामीण भागातील उद्योगांना तसेच राज्य सरकारच्या कामांना सवलत मिळाली आहे. 

loading image