आशादायक ! जगभरातील तब्बल १ लाख कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना व्हायरसपासून दिवसेंदिवस धोका वाढत चाललेला आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्ण सापडलेले असताना एक आशादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, जगभरातील जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत. ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे एक आशेचा किरण तयार झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून दिवसेंदिवस धोका वाढत चाललेला आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 175 देशांमध्ये 4 लाख 22 हजार 829 हून अधिक रुग्ण सापडलेले असताना एक आशादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, जगभरातील जवळ जवळ 1 लाख 09 हजार 102 लोकं निरोगी झाले आहेत. ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे एक आशेचा किरण तयार झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल 175 देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. कोरोना व्यायरसमुळे सध्या जवळजवळ संपूर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी त्याचा मृत्यू दर कमी आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमधून हा विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत चीनमध्ये सर्वात जास्त म्हणजे 73 हजार 650 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये 3 हजार 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या आकड्यात चीनला इटलीने मागे टाकले आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इटलीतील मृतांचा आकडा 6 हजारावर पोहचला आहे. तर 8 हजार 326 लोकं निरोगी झाले आहे. तर इराण यात तिसऱ्या क्रमांकवर आहे. इराणमध्ये गेल्या काही दिवांसापासून मृतांची संख्या कमी झाली आहे. इराणमध्ये 8 हजार 376 लोकं निरोगी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus outbreak total 1 lakh recovered in world

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: