देशात 24 तासात ७८० कोरोनाग्रस्त वाढले; एकूण रुग्णसंख्या ५२०० तर ५० जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 9 April 2020

देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येतील वाढता कल कायम असून गेल्या चोवीस तासात ७८० कोरोनाग्रस्त वाढले आणि देशातील एकूण रुग्णसंख्या ५२०० वर पोहोचली. लॉकडाउनला सोळा दिवस उलटल्यानंतर देशभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून ४०१ लोक बरेही झाले आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येतील वाढता कल कायम असून गेल्या चोवीस तासात ७८० कोरोनाग्रस्त वाढले आणि देशातील एकूण रुग्णसंख्या ५२०० वर पोहोचली. लॉकडाउनला सोळा दिवस उलटल्यानंतर देशभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून ४०१ लोक बरेही झाले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या चोवीस तासांत देशातील रुग्ण संख्येत झालेल्या वाढीत महाराष्ट्रात सर्वाधिक ६७ रुग्ण आढळले असून बळींची संख्याही वाढली आहे. गुजरात, मध्यप्रदेशातही संसर्ग वाढला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने हा लॉकडाउन जरी वाढवला नाही तरी शैक्षणिक संस्था, मॉल आणि धार्मिक संस्थांवरील बंदीची मुदत किमान १५ मे  पर्यंत वाढवावी अशी आग्रही शिफारस केली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशने मास्क घालून बाहेर न पडणे हा गुन्हा मानला जाईल असे आदेश काढले आहेत. दिल्लीत आज हनुमान जयंतीच्या दिवशी बहुतांश मंदिरांमध्ये सामसूम दिसत होती.

कॅनॉट प्लेस भागातील प्राचीन मंदिरामध्ये आलेल्या तुरळक भाविकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून दर्शन घेतले. मात्र आता पोलिसांना शबे बारात निमित्त मशिदीत होऊ घातलेल्या संभाव्य गर्दीमुळे अतिरिक्त ताण आला आहे. दिल्लीतील अनेक मशिदींनी आज शबे बारातला मशिदींमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन केले. घरातच राहून कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा, असे आवाहन केले आहे. दिल्ली पोलीस, राज्य सरकार आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांनीही लोकांना, घरी राहूनच प्रार्थना करा असे आवाहन 
केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Patient Increase in india