esakal | पंतप्रधान मोदींनी केली जनता कर्फ्युची घोषणा; या दिवशी होणार अंमलबजावणी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus pm narendra modi memorandum appeal public curfew 22 march

जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडायचं नाही. त्यांनी दिवशी सगळ्यांनी घरी बसायचं. हा एक प्रयोग आहे.

पंतप्रधान मोदींनी केली जनता कर्फ्युची घोषणा; या दिवशी होणार अंमलबजावणी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसचा होत असलेला फैलाव आणि भारतापुढं उभं राहिलेलं आव्हान या पार्श्वभूमीवर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. कोरोनाचा भारतावर परिणाम होणार नाही, हा भ्रम असल्याचं सांगत त्यांनी देश वासियांना सावध केलं. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंतप्रधान मोदींचे आवाहन
संकल्प आणि संयम या मार्गानेच कोरोनाच्या आव्हानाला सामोरं जाता येईल, असं सांगूनमोदी म्हणाले, 'मी देशवासियांकडून आज काही तरी मागणार आहे. जनतेनं कधीही मला निराश केलेलं नाही. कोरोनाशी मुकाबला म्हणजे, हा जनता कर्फ्यू आहे. येत्या रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडायचं नाही. त्यांनी दिवशी सगळ्यांनी घरी बसायचं. हा एक प्रयोग आहे. या अनुभवातून आपल्याला पुढचं आव्हान पेलण्यासाठी दिशा मिळेल. अत्यावश्यक सेवांशिवाय कोणीही त्या दिवशी घरातून बाहेर पडू नये. आतापासून सर्व स्वयंसेवी संघटना, संस्थांनी याबाबत जनजागृतीचं काम सुरू करायला हवं. हा कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी भारत किती तयार आहे. हेदेखील यातून स्पष्ट होईल.'

आणखी वाचा - पुण्यात पान टपऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची मोठी घोषणा

महारोगाच्या विरोधातील लढाईत मानव जातीचा विजय होईल. प्रत्येकजण त्याचं योगदान देत आहे. तुम्हीही द्या. स्वतःला या रोगापासून वाचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण सगळे एक होऊ या आणि या आव्हानाला तोंड देऊया.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

आणखी वाचा - इटली-चीन-कोरोना काय आहे कनेक्शन

नरेंद्र मोदी म्हणतात 

  • प्रत्येकानं स्वच्छ, निरोगी राहणं गरजेचं 
  • ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये 
  • इतरांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका 
  • गर्दीपासून सगळ्यांनी दूर रहावे 
  • कार्यालयीन कामे तुम्ही घरातूनच करा 
  • कोरोनामुळं उभ्या राहिलेल्या आर्थिक आव्हानालाही सामोरं जाणार 
  • अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड 19 टास्क फोर्सची स्थापना 
loading image
go to top