esakal | 'लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही'; केंद्राचं राज्यांना पत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus state has not authority about lockdown home ministry letter

लॉकडाऊनच्या काळात राज्ये त्यांच्या अखत्यारीत परवानगी देऊ शकत नाहीत. मात्र निर्बंध अधिक कठोर करू शकतील.

'लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही'; केंद्राचं राज्यांना पत्र 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन कोणतेही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना शिथिल करता येणार नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. केरळमध्ये राज्य सरकारने काही ठिकाणी रेस्टॉरंट्स सुरू करण्यास परवानगी दिली. त्याची केंद्रीय गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेतलीय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनच्या काळात राज्ये त्यांच्या अखत्यारीत परवानगी देऊ शकत नाहीत. मात्र निर्बंध अधिक कठोर करू शकतील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. देशातील ज्या भागात कोरोनाचा प्रसार कमी आहे, तेथे काही उद्योग-व्यवसाय आजपासून सुरु करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, तेच केवळ सुरू राहतील, असेही पत्रात नमूद केले आहे. 

आणखी वाचा - लॉकडाऊन शिथील झाला आणि समुद्रकिनाऱ्यावर झुंबड 

केरळला स्वतंत्र पत्र 
केरळ सरकारने राज्यातील काही भागांतील हॉटेल, पुस्तके विक्रीची दुकाने, केशकर्तनालये आजपासून सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यावर तीव्र आक्षेप घेत गृह मंत्रालयाने केरळला स्‍वतंत्र पत्र पाठविले आहे. काही राज्यांनी अत्यावश्‍यक सेवेची काल तयार केली होती आणि आजपासून लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर भल्ला यांनी कालच तातडीने राज्यांना पत्र पाठविले. 

आणखी वाचा - अमेरिकन्सचे दिवस फिरले, अलिशान जगणारे जेवणाच्या रांगेत

केंद्राशी मतभेद नाहीत : सुरेंद्रन 
केरळमध्ये लॉकडाउनचे नियम हटविल्याच्या वृत्ताचा राज्याचे पर्यटन मंत्री कडाकामपल्ली सुरेंद्रन यांनी इन्कार केला. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच आम्ही निर्बंध थोडे कमी केले आहे. गैरसमज झाल्याने केंद्राने आमच्याकडून खुलासा मागितला आहे. तो दिल्यावर ते दूर होतील. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र आणि राज्याची भूमिका एकच असून त्यात विरोधाभास नाही, असे त्यांनी सांगितले.